Saturday, April 27, 2024
Homeनगरराष्ट्रीय संपादणुकीत राज्य सरस

राष्ट्रीय संपादणुकीत राज्य सरस

संगमनेर | Sangamner

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात सर्वेक्षण करण्यात येते.देशातील शैक्षणिक संपादणूक जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण शास्त्रीय पध्दतीने नमूना निवड करून करण्यात येते. जगातील हे सर्वात मोठे शैक्षणिक सर्वेक्षण मानले जाते. महाराष्ट्रातील 7 हजार 226 शाळा,2 लाख 16 हजार 277 विद्यार्थी, 30 हजार 566 शिक्षकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.

- Advertisement -

या निमित्ताने विविध राज्य व जिल्ह्यातील शैक्षणिक संपादणुकीचा स्तर समोर आला आहे. सर्वेक्षण अहवालानुसार शाळांना नव्या बदलांचा विचार करत सामोरे जावे लागणार आहे. राज्य व अहमदनगर जिल्ह्यात भाषेचा आलेख साठ टक्क्यांच्या पुढे जात नाही तर गणिताचे संपादणूक चाळीस टक्क्यांच्या पुढे जाताना दिसत नाही .त्यामुळे विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांचा संपादणूक स्तर उंचावण्यासाठीचे नवे आव्हान कसे पेलणार यावरच राज्याची शैक्षणिक गुणवत्ता अवलंबून असणार आहे.

या सर्वेक्षणात मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी, आधुनिक भाषा या विषयांच्या अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने संपादणुकीचे मापन करण्यात येते. त्यानुसार भाषा विषयाचा संपादणूक 61 टक्के असून राष्ट्रीय स्तराची सरासरी 57 टक्के व जिल्ह्याची सरासरी 65 टक्के आहे. गणिता राष्ट्रीय व राज्याची सरासरी 42 टक्के व अहमदनगर जिल्ह्याची सरासरी 46 टक्के आहे. परिसर अभ्यासात राज्य 57 टक्के, राष्ट्रीय सरासरी 52 टक्के असून जिल्ह्याची सरासरी 61 टक्के आहे. सामाजिक शास्त्राची संपादणुकीचा विचार करता राज्य 39 टक्के, राष्ट्र 38 व जिल्हयाची सरासरी 43 टक्के आहे. आधुनिक भारतीय भाषेत राष्ट्राची सरासरी 41 टक्के, राज्य 44 तर जिल्हा 49 टक्के इतकी आहे. विज्ञान विषयाची राष्ट्रीय व राज्याची सरासरी 37 टक्के, जिल्ह्याची सरासरी 40 टक्के आहे. इंग्रजीचा विचार करता राष्ट्रीय सरासरी 43 टक्के, राज्य 46 टक्के आणि जिल्ह्याची सरासरी 47 टक्के इतकी आहे.राष्ट्रीय ते जिल्हा अशी तुलना केली असता फार दखल घ्यावी अशी वाढ अधोरेखित होत नाही.

देशात तिसरीत भाषेत पंजाब (355) गुण प्राप्त करत प्रथम स्थानावर असून महाराष्ट्र (333) गुण मिळवत सहाव्या स्थानावर आहे. गणितात पंजाब प्रथम (339) महाराष्ट्र (316) तृतीय स्थानावर आहे.विज्ञान व परिसर अभ्यासात पंजाब (310) महाराष्ट्र (291) पाचव्या स्थानावर आहे. इयत्ता दहावीत भाषेत (267) सातव्या स्थानावर,गणित (211) एकविसाव्या स्थानावर, विज्ञान (202) चौविसाव्या स्थानावर, सामाजिक शास्त्रात (233) अठराव्या स्थानावर, इंग्रजीत (286) अठराव्या स्थानावर आहे. राज्याच्या सरासरीत अहमदनगर जिल्हा पहिल्या पाचमध्ये इतर कोणत्याच इयत्तेत नाही.

मात्र आठवीच्या सरासरीत जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे. अहमदनगर जिल्ह्यात निर्धारित विषयाची संपादणूक प्राप्त नसल्याचे सरासरी प्रमाण 32.71 टक्के इतके आहे. पायाभूत संपादणूक प्राप्त असल्याचे सरासरी प्रमाण 34.71 टक्के इतके आहे. तर प्राविण्यप्राप्त असण्याचे शेकडा प्रमाण 25.28 टक्के इतके आहे. तर प्राविण्याच्या वरच्या स्तरावर 7.28 टक्के विद्यार्थी आहेत. विज्ञानात 72 टक्के मुले पायाभूत क्षमतेपेक्षा कमी असल्याची बाब समोर आली आहे. त्या खालोखाल सामाजिक शास्त्र 47 टक्के, परिसर अभ्यासात 25 टक्के,गणितात 27 टक्के मुलांना पायाभूत क्षमताही प्राप्त नाहीत.

राज्यात सोलापूर अव्वल

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवीदिल्लीच्यावतीने प्रकाशित संपादणूक सर्वेक्षण अहवालात यावेळी सोलापूर जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.सोलापूरची सरासरी (73.2 टक्के) सिंधुदूर्ग, मुबंई, रत्नागिरी दुसर्‍या स्थानी असून सरासरी (70.1) कोल्हापूर (69.5) अहमदनगर (68.7) सांगली (68.6) नाशिक (67.3) रायगड (66.7) हिंगोली (66.5) गोंदिया (64.7) टक्के आहे. लातूर पॅटर्न म्हणून प्रसिध्द असलेला लातूर (58.7 टक्के) सर्वात कमी संपादणूकीची स्तराची सरासरी गडचिरोलीची असून ती (48.7 टक्के) इतकी आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, मुबंई उपनगर हे संपादणूक कमी असलेले पाच जिल्हे आहेत. (क्रमशः)

- Advertisment -

ताज्या बातम्या