Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनाशकात बुध्दविहारांचे राष्ट्रीय अधिवेशन

नाशकात बुध्दविहारांचे राष्ट्रीय अधिवेशन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बुध्दविहारांचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 13-14 नोव्हेंबरला नाशिक येथे होणार आहे. अधिवेशनाचे संयोजन बुध्द्विहार समन्वय समिती करीत आहे. 2014 पासून विविध राज्यांत कार्यक्रम होत आहेत…

- Advertisement -

यंदा अधिनेशनाचा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. नाशिक हेे आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे केंद्र असल्याने अधिवेशनासाठी नाशिकची निवड झाली आहे.

13 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स् येेथे अधिवेशनाला आरंभ होणार आहे. धम्म ध्वजाारोहन, बुध्द वंदना, भोजनदान, बुध्द-भीम गीतगायन व नंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल.

दिल्लीचे पत्रकार सुधीरराव सिंह यांच्या हस्ते उदघाटन होईेल. अधिवेशनच्या अध्यक्षस्थानी भिख्खुविनय बोधीप्रीय असतील. नाशिकचे बौध्द विचारवंत नंदिकिशोर साळवे अधिवेशनाचे स्वगताध्यक्ष आहेत.

रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड, सीआर सांगलीकर फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड सी. आर. सांगलीकर, बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, निवृत् सनदी अधिकारी रमेश थेटे आदी प्रमुख अतिथी असतील. यावेळी धम्मनिकाय स्मरणिका प्रकाशन होणार आहे. विविध मान्यवरांचा नागरी सत्कारही याप्रसंगी केला जाणार आहे.

पहिल्या सत्रात ’पाली भाषा प्रचार-प्रसारात बुध्द विहार समन्वय समितीची भूमिका’ या विषयावर चर्चा होईल. अध्यक्ष्थानी लखनौचे डॉ. प्रफुल्ल गडपाल असतील. आचार्य राजेंद्र भालशंकर, रमेश बंकर आदी सहभागी होतीेल. द्वितीय सत्रात ’धम्मला गतिमान करण्यात बौध्द भिख्खु संघाचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात अध्यक्षस्थानी महस्थवीर सिलरक्षीत असतील.

भिख्खु कौडीन्य, भदन्त चक्रकिर्ती, भिख्खु कशलधम्मो सुंथरो चर्चेत सहभागी होतील. रविवारी दुसर्‍या सत्रात ’बौध्द लेण्यांचे महत्व तथा संवर्धन’ या विषयावर चर्चा होईल. आंबेडकरी विचारवंत बबन चहांदे अध्यक्षस्थानी राहतील.

सागर कांबळे, प्रा. अतुल भोसेकर, डॉ जितेंद्र कुमार चर्चेत सहभागी होतील. खुले अधिवेशन दुपारी चारला होईल. भिख्खु विनयबोधीप्रीय अध्यक्षस्थानी असतील. अभयरत्न बौध्द, फनसुक लडाखी, नंदकिशोर साळवे, अशोक बोधी, उमेश पठाऱे,प्रमुख अतिथी असतील. बुध्द-भीम गीत गायनाने अधिवेशनाचा समारोप होणार आहे, असे अधिवेशन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोसावी, मुख्य आयोजक उमेश पठारे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या