Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजनजागृती, प्रबोधनासाठी गोदाआरती

जनजागृती, प्रबोधनासाठी गोदाआरती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी सुरु केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन National Clean Ganga Mission अंतर्गत तीन दिवसीय गंगा महोत्सव उपक्रमांअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व गोदावरी गटारीकरण विरोधी मंच यांच्या वतीने रामकुंड Ramkund येथे गोदा दीपोत्सव कार्यक्रम Dipostav Festival आयोजित करुन नदी स्वच्छतेसाठी जनजागृती व प्रबोधना करिता नाशिककराना गोदावरी नदी आरतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. प्रदीप जोशी, उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे व पंचवटी विभागीय आरोग्य अधिकारी संजय दराडे व आयोजक निशिकांत पगारे यांच्या हस्ते करण्यात आली.

गोदावरी नदीला भेट देण्याची मनापासून इच्छा होती. 15 वर्षापूर्वीची गोदावरी व आजची गोदावरी नदी अमुलाग्र बदल झाला असला तरी गोदावरी नदीत गटारी युक्त नाले असल्याचे पर्यावरण प्रेमी तक्रार करत आहे ही बाब दुर्दैवी आहे आपल्या शहराची नदी आपण स्वच्छ ठेवावी प्रशासनाकडून ही नदी स्वच्छते बाबत योग्य पावले उचलले जातील. असे आवाहन अधिकार्‍यांना करुन पर्यावरण प्रेमीना आश्वासन जोशी यांनी दिले.

या कार्यक्रमास गोदावरी गटारी करण विरोधी मंचचे योगेश बर्वे, प्रा सोमनाथ मुठाळ, उदय थोरात, सुनील परदेशी, कामिनी भानुवंशी, शांतीलाल नागरे, संजीव रेदासानी, राजेन्द्र सूर्यवंशी, विनोद पवळे, हेमंत कुलकर्णी, नितिन चौधरी, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या