Thursday, April 25, 2024
Homeनगरपी. एम. किसान सन्मान योजनेत अहमदनगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार

पी. एम. किसान सन्मान योजनेत अहमदनगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाल्याने संगमनेर तालुका आघाडीवर राहिला असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या जिल्ह्यांचा सन्मान होत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण समारंभ होत आहे.

जिल्ह्याचा पुरस्कार स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्स, पुसा येथील ए. पी. शिंदे सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाले आहे. तालुक्यात एकूण नोंदणी झालेले खातेदार 72 हजार 513 असून त्यापैकी 68 हजार 713 खातेदारांना आजपावेतो 7 हप्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांना आजपर्यंत मिळालेली एकूण 77 कोटी 72 लाख 68 हजार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या दिशानिर्देशात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे संगमनेर तालुक्याचे काम तहसिलदार अमोल निकम, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर व संबंधीत कामका पाहणारे अव्वल कारकून, सर्व मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी मंडळाधिकारी यांच्या एकत्रित टिम वर्कमुळे अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुका अव्वल ठरला आहे.

सदरचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्व यंत्रणांचे अभिनंदन होत असून यापुढेही अशाच प्रकारे संगमनेर तालुक्यात सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती व लाभ देण्यासाठी तीनही यंत्रणा प्रयत्नशील राहतील असा विश्वास तहसिलदार अमोल निकम यांनी व्यक्त केला आहे.

पीएम किसान सन्मान योजना अहमदनगर जिल्हा

एकूण नोंदणी : 6 लाख 97 हजार 920

एकूण लाभार्थी : 6 लाख 60 हजार 174

प्राप्त हप्ते संख्या : 7

जमा झालेली एकूण रक्कम : 719 कोटी 58 लाख 70 हजार

अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाले आहे. तालुक्यात एकूण नोंदणी झालेले खातेदार 72 हजार 513 असून त्यापैकी 68 हजार 713 खातेदारांना आजपावेतो 7 हप्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांना आजपर्यंत मिळालेली एकूण 77 कोटी 72 लाख 68 हजार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या दिशानिर्देशात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे संगमनेर तालुक्याचे काम तहसिलदार अमोल निकम, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर व संबंधीत कामका पाहणारे अव्वल कारकून, सर्व मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी मंडळाधिकारी यांच्या एकत्रित टिम वर्कमुळे अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुका अव्वल ठरला आहे. सदरचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्व यंत्रणांचे अभिनंदन होत असून यापुढेही अशाच प्रकारे संगमनेर तालुक्यात सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती व लाभ देण्यासाठी तीनही यंत्रणा प्रयत्नशील राहतील असा विश्‍वास तहसिलदार अमोल निकम यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे योजना?

अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. यात २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.

या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.२ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले

- Advertisment -

ताज्या बातम्या