Sunday, April 28, 2024
Homeजळगावरोटरी क्लब तर्फे १५१ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

रोटरी क्लब तर्फे १५१ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम (Rotary Club of Milkcity Sangam) चाळीसगाव या क्लब मार्फत चाळीसगाव , भडगाव , पाचोरा तालुक्यातील १५१ शिक्षकांना (teachers) नेशन बिल्डर्स अवॉर्ड (Nation Builder Award) देऊन गौरविण्यात आले.मागील दोन वर्षे कोरोना मुळे पुरस्कार दिले गेले नाहीत, त्यामुळे या वर्षी संख्या वाढून पुरस्कार देण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष दिपक पाटील , सचिव चंद्रकांत पाटील , गटविकास अधीकारी नंदकुमार डी वाळेकर , भडगावचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी , उमंगच्या अध्यक्षा संपदा पाटील , प्रोजेक्ट चेरमन डॉ संतोष मालपुरे , को चेरमन सुधीर आबा पाटील व क्लबचे सदशय उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषनात नंदकुमार वाळेकर साहेब म्हणाले की , मी सुद्धा एक शिक्षकच होतो नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गटविकास अधिकारी झालो, मात्र ग्रामीण भागातील शिक्षण सुधारावे, म्हणून विविध प्रयोग राबविण्यासाठी सतत शिक्षकांना प्रेरित करत असतो कारण सर्व वेवस्था ही शिक्षण प्रणालीवरच अवलंबून आहे, चाळीसगाव तालुक्यातून शिक्षकांचे अभ्यास गट तयार करून स्वतः, गटशिक्षणाधिकारी आम्हीं अभ्यास दोरे केले व चाळीसगाव तालुक्यातून ३१ शाळा या बी प्लस उपक्रमासाठी निवडून त्याचे काम सुरू आहे, पुढील टप्प्यात अजून काही शाळाची या उपक्रमात निवड करून तालुक्यातील शैक्षणिक वातावरण बदलून टाकायचे आहे , व या नेशन बिल्डर्स अवॉर्ड मधून तुम्हांला चांगली प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागायचे आहे , रोटरी क्लब ला मी धन्यवाद देईल की त्यांनी एवढा मोठा प्रोजेक्ट आज या शगुण लॉन्स ला राबवून शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

प्रास्ताविकात अध्यक्ष दिपक पाटील यांनी सांगितले की, शिक्षकांना प्रेरणा मिळावी , उत्साह वाढवा , चांगले काम करावे यासाठी जिल्हा , राज्य व राष्ट्रीय स्तरावरून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात , मात्र जिल्यावर तालुक्यातून एक , राज्यवर व राष्टीर्य स्तरावर पुरस्कार देताना मर्यादा असतात , अशा वेळी जिथे कमी तिचे आम्हीं रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव केला जातो , यात जि प , खाजगी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , ज्युनियर व सिनीयर कॉलेज , उर्दू , आश्रम शाळा अशा सर्व स्तरातील शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने दर वर्षी तालुक्यातून पुरस्कार दिले जातात. याप्रसंगी रवींद्र शिरुडे , लालचंद बजाज , ऍड ओमप्रकाश शर्मा , सुभाष करवा , आधार महाले, राजेंद्र छाजेड , माधवराव पाटील , श्रीकृष्ण अहिरे , संजय सोनवणे , मेघा बक्षी , स्मिता करमरकर , अनिता मोरे , शगुण लॉन्सचे संचालक अजित पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेरमन डॉ संतोष मालपुरे यांनी केले तर आभार सचिव चंद्रकांत पाटील यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या