Saturday, April 27, 2024
Homeनगरनाथषष्ठीसाठी जात असलेल्या भाविकांच्या मोटारसायकलला चांद्यात अपघात

नाथषष्ठीसाठी जात असलेल्या भाविकांच्या मोटारसायकलला चांद्यात अपघात

चांदा |वार्ताहर| Chanda

पैठण (Paithan) येथे नाथषष्ठीला (Nathashthi) जात असलेल्या दोघा भाविकांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक (Motorcycle hit by unknown vehicle) दिल्याने एकाचा मृत्यू (Death) झाला तर दुसरा गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना काल चांदा-कुकाणा रोडवर (Chanda-Kukana Road) चांदा (Chanda) येथे घडली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) शिलेगाव (Shilegav) येथील दोघे भाविक दुचाकीवरुन (एमएच 17 एडब्ल्यू 4335) पैठण (Paithan) येथे नाथषष्ठी साठी जात असताना बुधवारी सकाळी 11 वाजता चांदा-कुकाणा रोडवर (Chanda-Kukana Road) चांदा गावानजिक राजेंद्र पेट्रोलपंपासमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेही खाली पडले.

यात बापूसाहेब रघुनाथ वाघ (वय 62) रा. शिलेगाव ता. राहुरी हे जागीच ठार झाले तर बंडू यादव पवार हे गंभीर जखमी झाले. दोघे एकमेकांचे साडू होते. दरम्यान सदर अपघाताबाबत सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या