Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव उद्यापासून

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव उद्यापासून

नाशिक । प्रतिनिधी Nashik

किर्ती कला मंदिर कथक नृत्य संस्थेच्या (Kirti Kala Mandir Kathak Dance Institute ) वतीने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात साजरा होणारा नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव (Nataraja Pandit Gopikrishna Jayanti Festival ) यंदा 29, 30, आणि 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता किर्ती कला मंदिरच्या फेसबुक पेजवर पाहता येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, महोत्सवाचे पहिल्या पुष्पात दुर्वाक्षी पाटील यांचे एकल कथक नृत्यासोबत पंडित बिरजू महाराज यांचे नातू त्रिभुवन महाराज या दोन्ही कलाकारांची नृत्यप्रस्तुती 29 ऑगस्टला सायंकाळी 6.30 वाजता फेसबुकवर होणार आहे.

तर महोत्सवाचे द्वितीय पुष्प 30 ऑगस्ट रोजी, कथक – स्वातंत्र्या नंतरचा 75 वर्षांचा प्रवास या चर्चासत्रामध्ये नृत्यांगना विदुषी शमाताई भाटे, पंडिता उमा डोग्रा, गुरु नलिनी व गुरु कमलिनी अस्थाना, आणि गुरु रेखा नाडगौडा आपली मते मांडणार आहेत.

तर महोत्सवाचे शेवटचे पुष्प 31 ऑगस्ट रोजी भरतनाट्यम गुरु, अभ्यासक आणि नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा ह्यांच्या शास्त्राधारीत व्याख्यानाबरोबर नृत्याच्या प्रात्यक्षिकासह फुलणार आहे.

यंदाच्या ऑनलाईन महोत्सवात डोर..Dance: the mirror of time हा नवीन विचार मांडला जाणार आहे.

महोत्सव पूर्णपणे निःशुल्क असून, सर्व सत्रात कलाप्रेमी त्याचबरोबर संगीत व नृत्य केलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी आपली हजेरी लावावी असे आवाहन किर्ती कला मंदिरच्या रेखाताई नाडगौडा व अदिती पानसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या