Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनस्तनपूर यात्रोत्सव रद्द

नस्तनपूर यात्रोत्सव रद्द

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

श्री शनी महाराजांच्या प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र नस्तनपूरला येत्या (दि. 13) शनिवार रोजी शनी अमावस्या निमित्त भरणारा यात्रोत्सव करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आ. अ‍ॅड. अनिल आहेर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी सर्व देवस्थानांचे यात्रोत्सव रद्द केले आहेत. शनिवारी शनी अमावस्यानिमित्त लाखो भाविक श्री शनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. गर्दीमुळे विषाणूचे संक्रमण फैलावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने श्री शनी महाराजांचा यात्रोत्सव रद्द करण्यात येत आहे.

यासंदर्भात संस्थानचे विश्वस्त मंडळ व यात्रोत्सव समिती यांची सभा पार पडली असता सदर निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसरात कुणीही नारळ, प्रसाद, खेळणी इत्यादी कुठल्याही प्रकारचे दुकान लावू नये अन्यथा कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संस्थानच्या नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार 3 ते 4 भाविकांच्या उपस्थितीत करोना नियमांचे पालन करून श्री शनी महाराजांचा महाभिषेक सोहळा व पूजा संपन्न होणार असल्याचे अ‍ॅड. आहेर यांनी सांगितले. सभेस अध्यक्ष नारायण अग्रवाल, विश्वस्त खासेराव सुर्वे, विजय चोपडा, महावीर पारख, उदय पवार, शरद आहेर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या