Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचे तापमान घसरले

नाशिकचे तापमान घसरले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे तापमान घसरण्यास सुरवात झाली असून आज किमान तापमान चक्क 11.2 तर कमाल तापमान 27.7. अश सेल्सीअस इतके नोंंदवले गेले. काल कमाल अन किमान तापमान दोन अंंशांनी घसरले. त्यामुळे हुडहुडी जाणवु लागली आहे.रात्री नऊ ते सकाळी सात पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. 20 नोव्हेबरपर्यंत ही थंंडी अशीच वाढत राहणार आहे.नाशिकपेक्षा निफाडचे तापमान एक अंंशाने कमी राहत असल्याने निफाड परीसरात थंडीचा कडाका थोडा जास्तच वाढणार आहे.

- Advertisement -

उत्तर भारतात आजपासून बर्फवृष्टीला सुरवात झाल्याने त्याचे परीणाम जाणवू लागले आहेत. दक्षिणेत 20,21 नोव्हेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.नाशिकमधील थंडीची लाट अजुन रविवार पर्यंत असेल. त्यानंतर ती थोडी ओसरु लागेल.मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दिड अंशाने घसरण होणार असुन थंडी जाणवत राहणार आहे. दुपारच्या तापमानात मात्र 1 ते दिड अंशाने वाढ होत असुन त्यामुळे दुपारचे वातावरण ऊबदार राहणार आहे, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या