Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबिटको हॉस्पिटल तोडफोड : नगरसेविका पतीस जामीन

बिटको हॉस्पिटल तोडफोड : नगरसेविका पतीस जामीन

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashik

बिटको कोविड हॉस्पिटलच्या (Bytco Covid Hospital) तोडफोड प्रकरणी राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे (Rajendra Tajane) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, बिटको कोविड सेंटरमध्ये (Bytco Covid Center) रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. तसेच रेमीडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या निषेधार्थ भाजपा नगरसेविका डॉ सीमा ताजणे पती राजेंद्र (कन्नू) ताजणे यांनी बिटको कोविड सेंटरच्या काचेच्या प्रवेशद्वारातून इनिव्हा गाडी घालून नुकसान केले होते.

डॉक्टरांच्या दिशेने पेवर ब्लॉक (Paver Blocks) भिरकावला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ताजणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. प्रकार घडल्यापासून ताजणे हा फरारी होता. शहरातील पोलीस दल त्याचा शोध घेत होते. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती.

त्यानंतर मागील आठवड्यामध्ये ताजने हा पोलिसांना शरण आला होते. त्यांना अटक करून दोन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली होती.

पोलिस कोठडी (Police Custody) संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती त्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ताजणे यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद लक्षात घेऊन अटी व शर्तीवर राजेंद्र कन्नू ताजणे (Rajendra Kannu Tajane) यांना जामीन मंजूर केला. यांच्यावतीने एड. अमित प्रधान (Adv Amit Pradhan) यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या