Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो नियम पाळा; नाहीतर अत्यावश्यक सेवा बंद कराव्या लागतील – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिककरांनो नियम पाळा; नाहीतर अत्यावश्यक सेवा बंद कराव्या लागतील – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. नाशिककरांनी खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र, संचारबंदी असूनही  नागरीक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे जर नाशिककरांनी सहकार्य करत नियम न पाळल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्या लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरस तिसर्‍या टप्प्यात असून त्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातही हे संकट येऊन ठेपल आहे. त्यावर अद्याप कुठलाही इलाज नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच खरा इलाज असून त्यासाठी घराबाहेर न पडणे हा सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. हे वारंवार सांगूनही नागरीक घरा बाहेर पडत आहेत.

विशेषत: अत्यावश्यक वस्तू खरेदिसाठी नागरिक गर्दी करत आहेत. दूध, भाजीपाला, किराणा सामान खरेदीसाठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सी नियमांचे उल्लंघन होत आहे.

आवश्यकता नसताना वाहन घेऊन रस्त्यावर येत आहे. पोलिसांनी कारवाई करुनही नागरीक जुमानत नाहीत. हा सर्व प्रकार बघता जिल्हा प्रशासन आता कारवाईचा बडगा उगरणार आहे. घरात बसावं अन्यथा जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा बंद करण्याशिवाय प्रशासनाकडे कुठलाही पर्याय राहणार नाही. असे इशारा वजा आवाहन जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी नाशिककरांना केले.

तसेच १८८ अंतर्गत कारवाई झाली तर आता नाही पण सहा महिन्यानंतर दुष्परिणाम कळेल. त्यामूळे कुणीही घराबाहेर पडू नका. असेही त्यांनी सांगितले आहे .

डॉक्टरांनी घाबरू नये

डॉक्टरांनी अजिबात घाबरू नये, सुरक्षित राहावे. आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. असा दिलासा जिल्हाधिकारी मांढरे यांनी डॉक्टरांना दिला.डॉक्टरांकडे लोक देव म्हणून बघतात,त्यांनी क्लिनिक बंद ठेवू नये. रुग्णाला मानसिक बळ देण्याची आज गरज असल्याचे भावनिक आवाहनही केले.

पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५० लोकांची तपासणी सुरू..

-२० पथक लासलगाव परिसरात तपासणीसाठी स्थापन
– शंका असलेल्या लोकांनी स्वतः होम क्वारंटाईन होणं गरजेचं..
-काही क्लिनिक फक्त श्वसनाच्या आजारांसाठी आरक्षित करणार.-स्थलांतरित लोकांसाठी शासनाची योजना आहे..
-सध्या शेलटर मध्ये ९७२ लोक आहेत..

पेट्रोलपंपावर नियम उल्लंघन

दुचाकीसाठी शंभर तर चारचाकीसाठी दिवसाला हजार रुपयांचे पेट्रोल देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, आवश्यकता नसताना नागरीक पेट्रोल टाक्या फुल्ल करत आहे. पेट्रोपपंपावर इंधन मर्यादेचे उल्लंघन केले जात असल्याचे पहायला मिळत आहे. नांदेड व बीडप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना पेट्रोल व डिझेल देण्यास बंदीचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या