Friday, April 26, 2024
Homeक्रीडानाशिकच्या चिमुकल्या अबीरने सर केला हिमालयातील 'अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक'

नाशिकच्या चिमुकल्या अबीरने सर केला हिमालयातील ‘अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याने हिमालय पर्वत रांगेतील अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक (Annapurna Circuit Trek) पूर्ण केला आहे. अबीर मोरे असे या चिमुकल्याचे नाव असून तो निलम मोरे व संदिप मोरे या नेमबाजीतील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या दाम्पत्याचा मुलगा आहे….(nashikites abir more completed annapurna circuit trek)

- Advertisement -

अबीर वयाच्या ४ ते ५ व्या वर्षापासूनच नाशिकच्या आजुबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या (Sahyadri) डोंगरदऱ्यांमध्ये ट्रेक करत होता. वडील संदीप मोरे यांच्यासोबत अबीर ट्रेकिंगला जायचा. त्याच्या वडिलांनी एवरेस्ट बेसकॅम्प पुर्ण केल्यापासूनच त्याने हिमालयातील ट्रेक करण्याचा हट्ट धरला होता.

वय लहान असल्याने डॅाक्टरांचा सल्ला घेऊन तसेच नेपाळ सरकारच्या (Nepal Government) परवानग्या घेऊन अन्नपुर्णा ट्रेक सर करण्याचे त्यांनी ठरवले. नाशिकचे ट्रेकर्स रमेश वाघ, प्रशांत बच्छाव, नंदिनी दुबे व आनंदिता बरूआ (गोवाहाटी) हे या टीमचे सदस्य होते. अडचणींची सूरूवात प्रवासाच्या सूरूवातीलाच झाली. १२ वर्षाखालील मुलांना कोवीड टेस्ट (Covid Test) आवश्यक असल्यामुळे विमानात प्रवेश नाही मिळाला. म्हणून अबीर वडीलांना सोडून अर्ध्या टीम बरोबर विमानतळावर एक दिवस रहावे लागले.

अबीर व त्याच्या टीमने १८ मे रोजी या ट्रेकला सुरूवात केली. रोज १०-१२ किमी चालत त्यांनी धारापानी येथे प्रथम नेपाळ सरकारची (Nepal Government) ट्रेकची परवानगी (Trekking permission) घेऊन मलांग, याक खाकरा, लेदर असा खडतर प्रवास केला. २२ मे ला थोरांग हाय कॅंप गाठले. २३ मे ला पहाटे ३ वा टीमने शेवटची समिटची चढाई सूरू केली. या चढाईच्या वेळी जोरात होणारी बर्फवृष्टी, झोबणारे वारे, विरळ होत जाणारा ॲाक्सिजन व भुस्खलनाच्या बाजुने जाणाऱ्या निमुळत्या वाटा या सर्व गोष्टींना न घाबरता त्यांनी साडेसहा तासात सर्वात उंच भाग म्हणजे थोरांग ला पास केला.

लगेच मुक्तिनाथ (Muktinath) या ठिकाणी ते आले. ट्रेकच्या प्रवासात परदेशी पाहुण्यांना अबीरकडे बघुन अप्रुप वाटत होते. प्रवासात प्रत्येक भेटणारा व्यक्ती त्याच्या सोबत गप्पा करत सेल्फी काढत स्वत:ला धन्य मानत होते. शारीरीक थकवा संपूर्ण ट्रेकभर अबीरला कधीच जाणवला नसल्याचे वडील संदीप मोरे यांनी सांगितले. त्याच्या शौर्याची दखल नेपाळ सरकारने घेतली. नेपाळ टुरीझम बोर्डकडून (Nepal Tourism Board) त्यास प्रमाणपत्र देत त्याला गौरवण्यात आले. भारतातील एकमेव सर्वात कमी वय असलेला अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणारा एकमेव मुलगा असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या