Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअखेर करंजवण धरणातून पाणी सोडले

अखेर करंजवण धरणातून पाणी सोडले

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले असून पालखेड धरण क्षेत्रसह कादवा नदीपात्रा लगतच्या गावातील पाणी पुरवठा योजनाना दिलासा मिळाला आहे. कादवा नदी पात्र कोरडे पडल्यामुळे गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती मात्र करंजवण धरण कादवा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे पालखेड धरण क्षेत्रसह कादवा परिसरातील पाणी योजनांना नवसंजीवनी मिळाली आहे…

- Advertisement -

गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे कादवा परिसरामध्ये जनावरासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्याचप्रमाणे सध्या करोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत असल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे.

तसेच करंजवण, ओझे, लखमापूर, म्हैळूस्के गावामध्ये असंख्य मूत्यू झाल्यामुळे अंत्यविधी , राख, दशक्रिया विधीदेखील सुद्धा कादवा नदीत पाणी राहिले नव्हते.

अखेर आज कादवा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे कादवा नदी परिसरासह पालखेड धरणक्षेत्रातील गावानी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या