Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपर्यटनासाठी नाशिकला या; पुढे दीड तासांत शिर्डीलाही पोहोचा

पर्यटनासाठी नाशिकला या; पुढे दीड तासांत शिर्डीलाही पोहोचा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नववर्षाचा आज पहिला दिवस. (First day of new year 2022) याच दिवशी नाशिककरांना आणि नाशिकमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. नाशिक-शिर्डी (Nashik Shirdi Travel) प्रवास आता दोन ऐवजी दीड तासांतच होणार आहे. सिन्नर-शिर्डी चौपदरी महामार्ग मार्चअखेर खुला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नाशिकहून अगदी सुस्साट शिर्डी गाठता येणे शक्य होणार आहे….

- Advertisement -

मुंबईकरांसाठी क्रांतिकारी निर्णय; ५०० चौ. फुटांपर्यंत घरपट्टी माफ

सिन्नर ते शिर्डी (Sinnar to Shirdi) हा ६० किमीचा महामार्ग आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. हा प्रकल्प ऑक्टरोबर 2022 (Oct 2022) मध्ये मार्गी लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरीदेखील जमिनींचे भूसंपादन लवकर झाले. अडथळे दूर झाल्याने सहा ते सात महिले लवकर हा मार्ग खुला केला जाणार आहे.

उपनगरमध्ये महिलेवर अत्याचार

नाशिक ते शिर्डी हे अंतर ९० ते १०० किमी आहे. मात्र या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे हे अंतर कमी होणार आहे. या महामार्गासाठी सिन्नरमधील १९ गावातील जमीन संपादित (land acquisition in 19 villages in sinnar) करण्यात आली आहे. नाशिक-पुणे महामार्गाला गुरेवाडी भागात हा मार्ग लागेल. शिवाय नगर-मनमाड महामार्गाला सावळीविहीर फाटा येथे हा मार्ग जोडला जाणार आहे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर दोन उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. गुरेवाडीनंतर मुसळगाव एमआयडीसीत दोन उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. त्यांची लांबी 500 मीटर असणार आहे. यासोबतच दातली, पांगरी, वावी आणि पाथरे येथे भुयारी मार्ग केला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात दर्डे, झगडेफाटा, सावळीविहीरमार्गे ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे भुयारी मार्ग तयार केले जातील असे बोलले जात आहे.

शिर्डीत साईबाबांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात. या भाविकांची संख्या लक्षात घेता या मार्गावर स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे. तब्बल 51 किलोमीटरचा हा मार्ग आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातून हा मार्ग जाईल.

हा रस्ता गुरेवाडी, मुसळगाव येथून सुरू होत आहे. पुढे तो सावळीविहीरपर्यंत पोहचेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग (Under Ground roads) करण्यात येणार आहेत. त्यात पांगरी, वावी, खोपडी, मुसळगाव फाटा आणि पाथरे येथे भुयारी मार्ग होणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या