Thursday, April 25, 2024
Homeनगरनाशिकच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; १७ जुगारी ताब्यात, १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

नाशिकच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; १७ जुगारी ताब्यात, १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर |Ahamadnagar

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकाने जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

- Advertisement -

१७ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री साडेबारा वाजता ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाख ६८ हजार ३६० रोख रक्कम, ८ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहने, २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी, २ हजार ५५० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य असा १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या नाकावर टिच्चून महानिरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या