Friday, April 26, 2024
Homeनगरजुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पथकाचा छापा

जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पथकाचा छापा

अहमदनगर | Ahmedagar

तालुक्यातील जेऊरपाठोपाठ अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकांने छापा टाकला.

- Advertisement -

व्यापारी, शेतकरी, ठेकेदार, नोकरदार असलेल्या 25 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व जुगार्‍यांकडून पोलिसांनी 4 लाख 55 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात 84 हजार 610 रूपयांची रोकड, 3 लाख 70 हजार रूपयांची वाहने, व 550 रूपयांचे जुगार्‍यांचे साहित्यचा समावेश आहे.

पकडण्यात आलेल्या जुगार्यामध्ये योगेश माणिक सुपेकर (रा. शिवाजीनगर, केडगाव), सागर शिवाजी कोल्हे, अनिल हरिभाऊ दरेकर (दोघे रा. एमआयडीसी, नगर), जगन्नाथ केरू शिदे, गोविंद शिवराम शिदे, दशरथ देवराम कांबळे, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड, विशाल तुळशिराम थोरात (सर्व रा. अरणगाव ता. नगर), अल्लाऊद्दीन ईसाक सैय्यद (रा. पाथडी), महेंद्र शिवानंद भांबळ, विशाल बबनराव चांदणे (दोघे रा. सिध्दार्थनगर, नगर), विजय बबनराव शिंदे (रा. टिळक रोड, नगर),दत्तात्रय खुशालचंद गिरमे (रा. केडगाव), हकिल अजीज पठाण (रा. श्रीरामपुर), भाऊसाहेब दिलीप तोरडमल (रा. श्रीगोंदा), सुनिल बंडु शितोळे, राहुल सुदाम गिरे (रा. शिरूर जि. पुणे), अनिल रामदास बोठे (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर), गणेश प्रल्हाद चौभे, भरत अर्जुन चोभे (दोघे रा. बाबुडी बेंद ता. नगर), विकास पदमाकर वराडे (रा. भिंगार), शेख लतीफ फत्तुभाई (रा. तिसगाव ता. शेवगाव), कैलास मच्छिंद्र लष्करे (रा. नेवासा), किरण बबन मुके (रा. कल्याण रोड, नगर), संतोष दादाभाऊ साबळे (रा. पारनेर) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या