नाशिक आरटीओची ५४ बसेसवर धडक कारवाई

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ, नाशिक ) शुक्रवारी रात्री अचानक खाजगी बसेसची तपासणी मोहीम राबवून ५४ बसेसवर कारवाई केली….

स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह जवळपास २० अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी खाजगी बसेसची तपासणी केली. प्रादेशिक परिवहन विभागाने प्रथमच अशा प्रकारच्या अचानक केलेल्या कारवाईमुळे खाजगी बस चालकांची तारांबळ उडून गेली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकारच्या महसुलावर परिणाम झाला होता. त्यातच शासनाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देखील मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु करोनामुळे प्रादेशिक परिवहन विभागावर देखील त्याचा परिणाम झाला आहे.

हळूहळू सर्व जनजीवन पूर्वपदावर येत असून दळणवळण देखील सुरू झाले आहे. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने महसूल वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून नियम न पाळणाऱ्या खाजगी बसेस विरोधात अचानक धडक मोहीम राबवून त्याची सुरुवात केली.

जिल्ह्यातील नाशिक- धुळे मार्ग, द्वारका, पुणे रोड, सिन्नर, घोटी टोल नाका, येवला- बोरगाव चेक पोस्ट नाशिक-मुंबई मार्ग आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली.

या कारवाईत स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, वासुदेव भगत, हेमंत हेमाडे, योगेश तातू, मोटर वाहन निरीक्षक विलास चौधरी, सचिन पाटील, समीर शिरोडकर, अनिल धात्रक, भीमराज नागरे, संदीप शिंदे, विजय सोळसे, राजेंद्र कराड, उमेश तायडे, सुनील पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील, संदीप तुरकणे आदी सहभागी झाले होते.

यात विना परवाना त्याचप्रमाणे परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालवणे, महाराष्ट्र राज्य तसेच परराज्यातील खाजगी प्रवासी वाहने, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहूक करणे, बसेच पासिंग नसणे ( योग्यता प्रमाणपत्र नसणे ), बसेसची रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायफर आदींची तपासणी तसेच वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, वाहन कर, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे आदींची यावेळी तपासणी करून कारवाई करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *