Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकरोड रेल्वेस्थानक झाले करोनाचे महाप्रवेशव्दार

नाशिकरोड रेल्वेस्थानक झाले करोनाचे महाप्रवेशव्दार

नाशिकरोड । Nashik

करोनाची मोठी लाट आली असतानाही नाशिकरोड रेल्वेस्थानकात देशभरातून येणा-या प्रवाशांच्या करोना संबंधित चाचण्या महिनाभरापासून बंद आहेत. त्यामुळे शहरात करोना संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वेस्थानकातील करोना तपासणी कक्षालाच टाळे ठोकण्यात आले आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात देशभरातून हजारो प्रवासी येतात. सध्या फक्त स्पेशल ट्रेन सुरु असूनही रोज दोन हजारावर प्रवासी येतात. त्यांच्या थर्मल स्क्रिनींग, करोना टेस्टसाठी स्वतंत्र कक्ष सुरु झाला आहे.

तेथे रेल्वेचे नऊ आणि महापालिकेचे सहा कर्मचारी तीन पाळ्यात काम करत होते. त्यांना सर्व संरक्षक साहित्य, करोना टेस्ट किट देण्यात आले होते. संशयित सापडल्यास प्रवाशाला बिटको दाखल केले जात होते. महिन्याला किमान पन्नास हजारावर प्रवाशांची तपासणी येथे होत होती.

आता महापालिकेकडे मनुष्यबळाची टंचाई असल्यामुळे दोन महिन्यापासून कक्षात फक्त तापमान नोंद होते. करोना टेस्टच होत नाही. देशभरातील प्रवासी थेट शहरात प्रवेश करत आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या प्रवेश कर, दंडाची मोहिम यांना फारसा अर्थ राहत नसल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या