Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनपातील सत्ताधारी भाजपकडून नाशिककरांची निराशाच

मनपातील सत्ताधारी भाजपकडून नाशिककरांची निराशाच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकून तीन वर्ष उलटून गेले असून अनेक कारणांमुळे नाशिककरांच्या पदरात ठोस असे सत्ताधार्‍यांकडून काही पडलेेले नाही.

- Advertisement -

आता करोना काळ अजून पुढे किती महिने चालणार हे सांगता येत नाही. आता पुढची निवडणूक लक्षात घेता सत्ताधार्‍यांकडे करुन दाखविले म्हणण्यासाठी केवळ 9 – 10 महिनेच शिल्लक आहेत. सत्ताधार्‍यांसमोर हा प्रवास अगोदरच्या सत्ताधार्‍यांच्या दिशेने जाऊ न देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 पार पडून आता साडेतीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागील महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याचे जाहीर केले होते. याच कारणास्तव महापालिकेत 60 जागा निवडणूक येत भाजपला एक हाती सत्ता मिळाली होती.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नाशिक महानगरपालिकेला माजी मुख्यमंत्र्यांना ठोस मदत करता आली नाही. दुदैवाने राज्यात सत्तांंतर झाल्याने भाजपच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. आता पुढच्या काळात महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही. एकुणच सत्ताधारी भाजपला गेल्या साडेतील वर्षाचा कालावधीत शहर विकासासंदर्भात मोठी कामे करता आलेली नाही.

आता आठ महिन्यापासून करोनामुळे महापालिकेतील विकास कामे ठप्प झाले असून ही स्थिती अजून किती काळ राहणार हे निश्चित नाही. परिणाम आता पुढच्या निवडणुकीला नऊ महिनेच शिल्लक असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये नाशिक महापालिकेवर झेंडा फडकावण्याची किमया माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केल्यानंतर नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षा मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडून होत्या.

मात्र शहरातील तीन आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने गेल्याने विकास कामांना खोडा बसला गेला. शहर भाजपतील अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांना पाठविले. यानंतरच्या आठ महिन्याच्या काळात सत्ताधार्‍यांचे मनसुबे उधळण्याचे काम तत्कालीन आयुक्तांनी केले. मुंढे यांच्यानंतर करवाढ कमी होऊन दिलासा मिळेल अशी नाशिककरांची अपेक्षा फोल ठरली.

विकासाची गाडी रुळात येत असतांनाच करोना साथीने सत्ताधार्‍यांना मागे खेचण्याचे काम केले. चालु आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात करोनामुळे मोठी घट झाल्याने अर्थिक घडी विस्कटली गेली आहे. उपलब्ध निधीतून पुढच्या शिल्लक काळात मोठा प्रकल्प अथवा ठोस विकासकामे होतील अशी शक्यता कमीच आहे. आता शिल्लक काही महिन्यात जास्तीत जास्त विकास कामे करण्याचे आव्हान सत्ताधार्‍यासमोर आहे.

सध्या तरी मुकणे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शहरात आलेले पाणी, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली व सुरू असलेली कामे, समान पाणी पुरवठ्यासाठी 25 जलकुंभास मंजुरी, माजी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट शहर बससेवा अशाप्रकारे ठळक कामांचे ब्रॅडींग सत्ताधारी भाजपला करावे लागणार आहे. मागील सत्ताधार्‍यांप्रमाणेच गत होऊ नये म्हणून भाजपला चुका दुरुस्त करण्यास संधी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या