Friday, April 26, 2024
Homeनाशिकस्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशात १७ व्या क्रमांकावर

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशात १७ व्या क्रमांकावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 swachh-survekshan-abhiyan या स्पर्धेमध्ये नाशिक महापालिकेला NMC देशात 17 वा तर राज्यात 4 था क्रमांक मिळाला आहे. स्पर्धा सर्व्हिस लेवल प्रोग्रेस, सर्टीफिकेशन प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया या तीन निकषांवर आधारित होती. राज्यात प्रथम क्रमांक नवी मुंबई शहराने मिळविला.

- Advertisement -

सर्टिफिकेशन, प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया या दोन घटकांमध्ये कमी गुण मिळाल्याने पहिल्या पाच शहरांमध्ये नाशिकचा समावेश होऊ शकला नाही. तसेच पुढील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये या घटकांवर भर देऊन पहिल्या पाचमध्ये येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

सर्व्हिस लेवल प्रोग्रेस 2080.27(2400), सर्टिफिकेशन 700(1800) व प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया 1467.78(1800) याप्रमाणे एकुण 4248.05 गुण मिळाले आहे. दरम्यान, 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देशात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने चौथे स्थान मिळवले तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंनने 2021 मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 2020 मध्ये देशात देवळालीचा 52 वा क्रमांंक होता.त्यास्थानावरुन थेट चौथ्या स्थानी उडी घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या