Friday, April 26, 2024
Homeनगरनाशिक, पुणे, कल्याण, औरंगाबादसाठी एसटीच्या फेर्‍या वाढल्या

नाशिक, पुणे, कल्याण, औरंगाबादसाठी एसटीच्या फेर्‍या वाढल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी मार्चमध्ये केलेल्या लॉकडाउनपासून एसटी प्रशासनाची घडी विस्कटलेली होती.

- Advertisement -

मात्र, सध्या करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने एसटी महमंडळाने विस्कटलेली ही घडी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच सध्या दिवाळी सणामुळे एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने फेर्‍याही वाढविण्यात आल्या आहेत. नगर विभागातून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक, पुणे, कल्याण, औरंगाबादसाठी एसटीच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.

करोना संकटामुळे एसटी प्रशासनाला मोठा फटका बसला. संपूर्ण घडी विस्कटली. एसटीची घडी पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी त्यात प्रशासनाला फारसे यश आलेले नाही. मात्र, सध्या दिवाळीची धामधूम सुरू झाल्यामुळे एसटीला प्रवाशांची गर्दी दिसून येऊ लागली आहे.

एसटीच्या आता आंतरजिल्हा, आंतरराज्य बस सुरू आहेत. 350 ते 400 बसच्या माध्यमातून रोज 950 फेर्‍या केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 350 बसच्या माध्यमातून 35 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे एसटी प्रशासनाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

तसेच, दिवाळीमुळे जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या गावांमध्येही एसटीकडून जादा बसचे नियोजन करण्यात आले असले, तरी गर्दी पाहूनच या जादा बस सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागाकडून सांगण्यात आले.

पुर्ण क्षमतेने धावण्यासाठी सज्ज

राज्य आणि केंद्र सरकारने एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी संख्येची अटक काढून टाकली आहे. यामुळे प्रवासी असल्यास पूर्ण क्षमतेने बसेस चालविता येतील. मात्र, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्वी प्रमाणे प्रवासी संख्या नाही. राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालय सुरू केल्यास एसटीच्या बसेसला पूर्वी प्रमाणे गर्दी होईल. यासह पूर्वी प्रमाणे पुर्ण क्षमतेने एसटी धावण्यास सज्ज असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेशन धान्य वाटपाचे काम काढले

लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाने माल आणि कृषी माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला चांगला प्रतिसादही मिळाला. एसटी महामंडळाने अन्य खासगी मालवाहतुकीपेक्षा किफायत दरात माल वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्याने बंदच्या काळात एसटीला उत्पन्नाचे स्त्रोत मिळाला. त्यानंतर सरकारी रेशनचे धान्यांची एसटीच्या माध्यमातून वाहतुक करण्यात आली. जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या 60 गाड्यातून रेशनच्या धान्यांची वाहतूक सुरू होती. मात्र, राज्य सरकारने हे काम एसटीकडून काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या