Friday, April 26, 2024
Homeनाशिकखुशखबर! महिला आयपीएल लिलावात नाशिकच्या 'या' खेळाडूंचा समावेश

खुशखबर! महिला आयपीएल लिलावात नाशिकच्या ‘या’ खेळाडूंचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी महिला आयपीएल लिलावात नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे (Maya Sonawane) आणि ईश्वरी सावकार (Ishwari Savkar) या दोन महिला क्रिकेट खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे…

- Advertisement -

महिला आयपीएल स्पर्धेच्या उद्घाटन पर्वासाठी जाहीर करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितल्यानुसार महिला आयपीएल स्पर्धेचा लिलाव १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

रामजन्मभूमी उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने….

माया सोनवणे आणि ईश्वरी सावरकर या दोन खेळाडूंची बेस प्राईस १० लाख रुपये इतकी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार यांच्यासह रसिका शिंदे, प्रियांका घोडके, साक्षी कानडी, लक्ष्मी यादव आणि शाल्मली क्षत्रिय या खेळाडूंचा यादीत समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भारतासह, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, विंडीज, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे, आयर्लंड या देशांच्या खेळाडूंचा लिलावात समावेश आहे.

धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

४०९ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी झाले आहेत. पाच संघाचा आयपीएल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. माया सोनवणे हीची चॅलेंजर करंडक स्पर्धेसाठी भारत अ संघात निवड करण्यात आली होती. ईश्वरी सावकार सलामीची फलंदाज असून, १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. चॅलेंजर करंडक तसेच श्रीलंका, विंडीजविरुद्ध झालेल्या चौरंगी मालिकेत ईश्वरीने प्रभावी फलंदाजी केली होती.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या