ऑक्सिजन गळती व मृत्यू प्रकरणाच्या चौकशी समितीत कोण?; शासनाकडून नावे जाहीर

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना काल (दि २१) दुपारी घडली…

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी या घटनेची सखोल चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये घटनेची पाहणी केल्यानंतर या घटनेची चौकशी सात सदस्यीय टीम करेल असे सांगितले होते.

त्यानुसार, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज या टीममध्ये राहणार असून त्यांची नावे आज घोषित करण्यात आली आहेत.

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही सात सदस्यीय टीम सखोल अभ्यास करणार आहे. तसेच या घटनेबाबत ही टीम येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

या सात सदस्यीय टीममध्ये आरोग्य उपसंचालक डॉ. पुना गांडाळ, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद गुंजाळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानेश्वर नाठे, नाशिक महापालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे,

अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार व तज्ञ हर्शल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे. याबाबतचे आदेश आज मंत्रालयीन उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी आज काढले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *