Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकविनामास्क धारकांवर नाशकात कारवाई; सव्वादोनशे जणांकडून ५० हजार दंड वसूल

विनामास्क धारकांवर नाशकात कारवाई; सव्वादोनशे जणांकडून ५० हजार दंड वसूल

नाशिक | प्रतिनिधी

करोना डोके वर काढू लागल्यानंतर नाशिक महापालिकेकडून विनामास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून सूरू झालेल्या कारवाईत जवळपास सव्वादोनशे नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ५० हजार दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

- Advertisement -

आजपासून नाशिक शहरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, तसेच लग्नसोहळे यामध्ये जर विनामास्क नागरिक दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, आज सकाळपासून नाशिक महापालिकेकडून विनामास्क धारक नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक दंड पंचवटी परिसरातून करण्यात आला. याठिकाणी ५२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यातून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यापाठोपाठ नाशिकरोड परिसरात ४० केस दाखल करण्यात आल्या. यातून८ हजारांचा दंड वसूल झाला. ना.पश्चिममध्ये ३५ केस दाखल झाल्या यातून ७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

ना. पुर्व भागात २१ केस दाखल झाल्या असून जवळपास ९ हजारांचा दंड वसूल झाला. सिडको भागात ३६ केस दाखल झाल्या ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल झाला.

पंचवटी परिसरात ५२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तर तिकडे सातपूर परिसरात ४२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असा एकूण २२६ नागरिकांकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या