Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या'या' योजनेत नाशिक मनपाचा राज्यात प्रथम क्रमांक; वाचा सविस्तर

‘या’ योजनेत नाशिक मनपाचा राज्यात प्रथम क्रमांक; वाचा सविस्तर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पीएम स्वनिधी योजनेत नाशिक मनपाने शहरातील 22 हजार 86 (124 टक्के) पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरण करुन राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

देशात 1 जून 2020 पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. नाशिक मनपाला 17,840 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरणात करण्यात नाशिक मनपाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक शहरात 22,086 (124 टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झालेले आहे. नाशिकने कोल्हापूर मनपाला मागे टाकले आहे.

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीचा मोठा परिणाम राज्यातील शहरांमधील फेरीवाले व पथविक्रेत्यांवर झाला होता.त्यांना व्यवसाय परत सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2020 रोजी या योजनेची घोषणा केली. नाशिक मनपाला 17 हजार 840 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने 26 हजार 234 (147 टक्के) पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केलेले आहे. बँकांनी 24 हजार 584 (138 टक्के) कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. त्यापैकी 22 हजार 86 (124 टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झालेले आहे.

‘स्वनिधी से समृद्धी’ अभियान

या योजनेकडे फक्त पथविक्रेत्यांना कर्ज द्यायची योजना असे न बघता त्यांच्या आर्थिक सामाजिक अशा सर्व समावेशक प्रगतीवर भर देण्याच्या सूचना मा. पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पथविक्रेत्यांना डिजिटल माध्यमाबाबत प्रशिक्षित करणे व त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून डिजिटल पेमेंट एग्रीगेटर यांच्या साह्याने पथविक्रेत्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे.

तसेच पीएम स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहार केल्यास प्रती व्यवहार 1 रुपया कॅशबॅक मिळणार आहे. केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण (सोशल इकॉनॉमी प्रोफाईलिंग) करण्याकामी देशभरातून पहिल्या टप्प्यात 125 पायलट शहरांमध्ये नाशिक मनपाची निवड करण्यात आली आहे. मनपाने 14,234 पथविक्रेत्यांची सोशल इकोनॉमी प्रोफाईलिंग भरून अव्वल स्थान मिळविले आहे. पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी केंद्र शासनाने ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियान सुरु केले आहे.

आठ योजनांचा लाभ

‘स्वनिधी से समृद्धी’ अभियानअंतर्गत लाभार्थ्यांचे सामाजिक-आर्थिक प्रोफाईलिंग ऑनलाईन पोर्टलवर भरून सदर लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना 1) पीएम मातृ वंदना योजना 2) जननी सुरक्षा योजना 3) पीएम सुरक्षा बिमा योजना 4) पीएम जीवन ज्योती बिमा योजना 5) पीएम जन धन योजना 6) एम श्रम योगी मानधन योजना 7) वन नेशन वन रेशन कार्ड 8) इमारत व इतर बांधकाम कामगार या आठ योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये 61 हजार 23 लाभार्थ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांना वरील आठ योजनांचा बँकेकडून तसेच जिल्हा पुरवठा विभाग, कामगार आयुक्त विभाग, आरोग्य विभागामार्फत 56 हजार 696 (93टक्के) लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.यामध्ये सद्यस्थितीत नाशिक मनपा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ङ्गतसेच नुकतेच खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण मेळाव्यात नाशिक मनपा पीएम स्वनिधी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर येथे 524 पथ विक्रेत्यांना परिचय बोर्ड तसेच 110 पथ विक्रेत्यांना क्यू आर कोड तसेच 126 पथ विक्रेत्यांना 50 हजार,20 हजार,10 हजारांचे कर्ज वितरण देखील करण्यात आले आहे.

पथविक्रेत्यांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करावे व त्याकरिता नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातील एनयूएलएम कक्षात संपर्क करुन नवीन यूपीआय आयडी,क्यूआर कोड काढून घेण्यात यावा. तसेच परिचय बोर्ड प्राप्त करून घ्यावे.

-करुणा डहाळे, मनपा उपआयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या