Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा निवडणुक: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक मनपा निवडणुक: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणुकीसाठी (election) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनेनुसार आज (दि. 21) नाशिक महापालिका प्रशासनाने (Nashik Municipal Administration)

- Advertisement -

एकूण 12 लाख 372 मतदारांची अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध केली. ऑनलाईन (online) पद्धतीने तसेच विभागनिहाय यादी (Department wise list) देखील प्रसिद्ध करून त्याची विक्री देखील सुरू करण्यात आली आहे. 6 लाख 29 हजार 682 पुरुष तर 5 लाख 70 हजार 636 महिला मतदार संख्या राहणार आहे. इतर 54 मतदार (voter) आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने 23 जून रोजी प्रमुख यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर तीन जुलै पर्यंत त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या या काळात तब्बल 3800 पेक्षा जास्त हरकती महापालिका प्रशासना (Municipal administration) प्राप्त झाल्या होत्या. यासाठी 44 विशेष पथकांची निर्मिती आयुक्तांच्या आदेशानुसार झाली होती तर प्रत्येक हरकतीची दखल घेतली स्थळ पाणी देखील करण्यात आली. यासाठी आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar), प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील (Deputy Commissioner of Administration Manoj Ghode-Patil) आदि अधिकाऱ्यांसह उपायुक्त तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अमान्य झालेल्या हरकती वगळून मान्य झालेल्या हरकती नुसार प्रारुप मतदार यादीत (Electoral Roll) बदल करुन अंतिम मतदार यादया प्रसिध्द (Final voter list released) करण्यात आल्या. अंतिम मतदार याद्या नागरिकांना पाहणीसाठी विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन मुख्यालय येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत पहाणीकरीता ठेवण्यात आल्या आहेत.

विक्री सुरू

आज अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्या राजीव गांधी भवन येथे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या मतदार यादीची किंमत प्रति पृष्ठ एक बाजु करीता रु.1.50/- दोन्ही बाजू करीता रक्कम रुपये 3/- या प्रमाणे एकुण पृष्ठाची होणारी रक्कम सर्वसाधारण पावतीव्दारे भरणा केल्यानंतर, उपलब्ध असल्यास त्याच दिवशी, नसल्यास छपाई करुन दुसऱ्या दिवशी निवडणूक विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या