Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी करोना 'पॉझिटिव्ह'

नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी करोना ‘पॉझिटिव्ह’

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काल (दि १६) रोजी लक्षणे जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते…

- Advertisement -

त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यादरम्यान ते करोनाबाधित आढळून आले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव नागरगोजे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

ते म्हणाले, महापौर कुलकर्णी यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महापौर कुलकर्णी यांनी शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खूप काळजी घेतली होती. त्यांच्याकडून वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत होत्या. नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत असतानाच महापौरांना करोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महापौर कुलकर्णी यांच्या संपर्कात कुणी आले असेल तर त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी तसेच त्यांच्या कुटुंबियांचीदेखील आज चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नागरगोजे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या