Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक बाजार समिती सभापती पदासाठी शुक्रवारी सभा

नाशिक बाजार समिती सभापती पदासाठी शुक्रवारी सभा

नाशिक । Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाचा संपतराव सकाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. २८) विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. यामुळे बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची निवड होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. सभापतीपदी देविदास पिंगळे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

- Advertisement -

कोवीड प्रादुर्भावामुळे बाजार समिती संचालक मंडळास वाढवून मिळालेल्या सहा महिन्यांच्या मुदत वाढीमुळे बाजार समितीच्या राजकारणात चांगलीक रंगत वाढली आहे. कोवीडमुळे जिल्ह्यात मुदत संपलेल्या संचालक मंडळाच्या बाजार समित्यांच्या निवडणूका पार पडणार आहेत. यामध्ये नाशिक कृऊबाचा देखील समावेश आहे.

पुढील निवडणूकीव्दारे दीर्घकाळ समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न आहे. त्याकरीता योग्य पार्श्वभूमी तयार करण्यासाठी सद्यस्थितीत राजकारणाचे डावपेच आखले जात आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संपत सकाळे यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर नवीन सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम २२ व २५ नुसार संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असल्याचे आदेश अध्यासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी काढले आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभेचे कामकाज सुरू होणार आहे. सकाळी ११ ते ११.२५ वाजेपर्यंत प्रोसिडिंग बुकवर सह्या,११.१६ ते ११.३५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे,११.३६ ते ११.४५ वाजेपर्यंत छाननी आणि निर्णय,११.४६ ते ११.५५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे,११.५६ ते १२.०५ वाजेपर्यंत आवश्यक असल्यास मतदानाची पूर्वतयारी, मतदान दुपारी १२.०६ मिनिटांनी मतदान संपेपर्यंत आणि मतदान संपल्यावर लागलीच मतमोजणी आणि निर्णय, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये १८ संचालक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या