नाशिक :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२ तारखेपासून संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. १२ मे रोजी दुपारी १२ पासून सुरु झालेले हे लॉकडाऊन २२ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. आता नव्याने काय भूमिका घ्यावी? यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक सुरु झाली.
दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले…
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या या बैठकीत नाशिकचे मनपा आयुक्त कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक पांडे व इतर अधिकारी उपस्थित आहे. या बैठकीत कडक लॉकडाऊन वाढणार की काही दिलासा मिळणार? यावर निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान या बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांशी चर्चा केली. बैठक संपल्यानंतर यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.