Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात ८४ मुली ‘माझी कन्या भाग्यश्री’

जिल्ह्यात ८४ मुली ‘माझी कन्या भाग्यश्री’

नाशिक | विजय गिते

मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवड प्रतिबंध करणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी‘माझी कन्या भाग्यश्री ’ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे.या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.सन २०१९-२०मध्ये आतापर्यंत १२ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून ३६ लाभार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आलेला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आर्थिक तरतूद केलेली आहे.या योजनेंतर्गत बालिका भ्रूणहत्या रोखणे,मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचारांनी बालविवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.ही योजना दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणार्‍या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्र्यरेषेवरील एपीएल कुटुंबात जन्माला येणार्‍या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ दिले जात आहेत.

या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर मातीने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे ५० हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येतात.दोन मुलीनंतर मातेने किंवा किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या पहिल्या व दुसर्‍या मुलीच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत ही गुंतवणूक करण्यात येते.

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७३ कुटुंबांना याचा लाभ मिळालेला असून या अंतर्गत १८ लाख ५० हजार रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे.सन २०१९-२० मध्ये आतापर्यंत १२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.उर्वरित ३६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून शासनाकडे यासाठी निधी मागविण्यात आलेला आहे.

सन २०१८-१९ मध्ये तालुकानिहाय लाभ घेतलेली कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे नागरी नाशिक -१९, मालेगाव -४ ,दिंडोरी -३,-सिन्नर -३,पेठ-२, बागलाण-१नाशिक-१,इगतपुरी -४, एकूण ७३.सन २०१९ २० मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थींची संख्या तालुकानिहाय-नाशिक ५,इगतपुरी-१, चांदवड-१,बागलान- ३,देवळा-१,दिंडोरी-१एकूण -१२.

योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘माझी कन्या भाग्यश्री ’ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे.मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवड प्रतिबंध करणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा.
अर्पणा खोसकर सभापती,महिला व बाल विकास जि.प.

- Advertisment -

ताज्या बातम्या