Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हा न्यायालयातील बार रूम्स होणार सुरू

जिल्हा न्यायालयातील बार रूम्स होणार सुरू

नाशिक । Nashik

जिल्हा व सत्र न्यायालयातील (District and Sessions Court) मागील दीड वर्षांपासून बंद असलेले बार रूम्स (Bar Rooms) अखेर सुरू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) घेतला आहे. काही दिवसांपुर्वीच नाशिक बार असोसिएशनने (Nashik Bar Association) याबाबत निवेदन देत बार रूम्स सुरू करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

वकिलांच्या या मागणीला यश आले आहे. या निर्णयामुळे चेंबर्स अभावी मिळेल त्या जागेवरून काम करणार्‍या वकीलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे वकीलांकडून स्वागत (Welcome from lawyers) करण्यात येत आहे.

करोना काळाचा मोठा फटका जिल्हा कोर्टाच्या (District Court) कामास बसला. मागील दीड वर्षात एखादा आणि अगदी किरकोळ कालावधी वगळता कोर्टाचे काम सुरळीत होऊ शकलेले नाही. याचा मोठा फटका वकीलांसह पक्षकारांना बसला. कोर्टाच्या तारखा लांबणीवर (Court dates extended) पडल्या आहेत. दरम्यान, चेंबर्स नसलेल्या वकीलांना बाररूम्स या हक्काच्या जागा ठरतात. दिवसभर पक्षकारांना भेटणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आदी कामे याच ठिकाणी होतात. मात्र बाररूम्स बंद असल्याने वकीलांची चांगलीच पंचाईत झाली.

आतातर पावसाळाही सुरू झाल्याने ही कोंडी वाढली. नाशिक जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीत एक तर नव्या इमारतीत दोन बार रूम्स आहेत. यातील एक बार रूम महिला वकीलांसाठी वापरली जाते. बार रूम्स वापरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 50 टक्के क्षमता, खुली हवा आणि करोना नियमांचे पालन करण्याची जबाबदारी वकीलांवर टाकली आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास सदर सुविधा बंद करण्यात येऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाचे वकिलांनी स्वागत केले आहे. याबरोबरच न्यायालये पुर्णवेळ सुरु करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या