Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँंकेला संजीवनीची गरज

जिल्हा बँंकेला संजीवनीची गरज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यातील 11 लाख खातेदार व शेतकर्‍याच्या जिव्हाऴ्याची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंक (nashik district cooperative bank) सध्या प्रचंंड अडचणीत आहे. बँकेला वेळीच संजीवनी न दिल्यास फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या प्रशासक असल्याने इतरांंनी त्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

- Advertisement -

आज बँकेत 2140 कोटी रुपयांंच्या ठेवी आहेत. एकूण 2250 कोटी येणे कर्ज आहे. 1700 कोटीची थकबाकी आहे. बँक सभासद संख्या 7800 आहे. 1500 वैयक्तिक सभासद आहेत. 11 लाख खातेदार आहेत.

नाशिक जिल्ह्यात 2 लाख 43 हजार शेतकर्‍यांना 1100 गावपातळीवर कार्यरत विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत कर्जपुरवठा केलेला आहे. बिगरशेती कर्जपुरवठा 94 संस्थांना 243 कोटी रुपये केलेला आहे. संचित तोटा 31 मार्च 2021 चा 681 कोटी रुपये आहे. मात्र गेली 5 वर्ष कर्जवसुली होऊ न शकल्यामुळे तोटा वाढला आहे. ही बँक नाशिक जिल्ह्यातील सहकार चळवळीचा कणा आहे. ही बँक वाचवणे गरजेचे आहे.

सद्यपरिस्थितीत कर्ज थकबाकी 1710 कोटी रुपये असल्यामुळे 71 टक्के एनपीए प्रमाण आहे. तर 677 कोटी येणे बाकी आहे. हे प्रमाण 52 %आहे. रिझर्व बँंकेच्या नियमाप्रमाणे जिल्हा बँकेला 15% ग्रॉस एनपीए व नेट प्रमाण 5 % आदर्श प्रमाण लागते. त्यामुळे आता जिल्हा बँकेला बँक परवाना वाचवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

आरबीआयने परवाना रद्द केल्यास ठेवी स्वीकारता येणार नाहीत. ठेवीदार अडचणीत येतील. म्हणूनच ही कटु वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध होणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी त्वरित 732 कोटी रुपये बँकेत येणे आवश्यक आहे. मात्र शेतकरी करोनामुळे व पिकाला भाव नसल्यामुळे कर्ज भरत नाही.महाराष्ट्र शासनाने केलेली कर्जमाफीची 100% अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे बंँक अडचणीत आहे.

हे आहेत पर्याय

जिल्हा बँक वाचवण्यासाठी 1 हजार कोटी रुपये ठेवी जमा करणे, सभासद संस्था व वैयक्तीक सभासदाकडून 732 कोटी रुपये रुपये शेअर्स भागभांडवल उभारणे, नवीन सभासद करून भागभांडवल उभारणे, नवीन कर्ज वाटप करून शेअर्स कपात करून भागभांडवल उभारणे, कर्ज वसुली 1 हजार कोटी करून तोटा कमी करणे,

अथवा महाराष्ट्र शासनाकडून 732 कोटी रुपये भागभांडवलात गुंतवणूक करून मदत करवून घेणे हे पर्याय सध्या आहेत. राज्य सरकारने अथवा केंद्र सरकारने 732 कोटी भागभांडवल मध्ये गुंतवणूक करून ऐतिहासिक वारसा असलेली गावपातळीवर सोसायटीमार्फत 3 लाख शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सक्षम व्यवस्था असलेली बँंक वाचू शकते. त्यासाठी सर्व पक्षीय नेते व आजी-माजी संचालकांंचा पुढाकार गरजेचा आहे, अन्यथा वेळ गेल्यावर बोलण्यात काही अर्थ राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या