Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्हा झाला टँकरमुक्त

नाशिक जिल्हा झाला टँकरमुक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात ७ जूनला मान्सून आगमन झाले.यामुळे जिल्ह्यावरील पाणीसंकट पूर्णपणे टळले आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.त्यामुळे जुलैच्या पंधरवड्यात जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जिल्ह्यात यंदा ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता.

- Advertisement -

गतवर्षी पडलेला भरपूर पाऊस आणि यंदा धरणांमध्ये उपलब्ध असलेला मुबलक पाणीसाठा पहायला मिळत आहे.पाऊसही नियमित सुरू असल्याने टंचाईचे दुर्भिक्ष टळले आहे. एक वेळ ५२ वर गेलेली टँकर संख्या आता शून्य झाली आहे. जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली होती. त्यामुळे दोन-तीन दिवस पाऊस सुरू होता. तसेच यंदा करोना संकटामुळे नियोजित व्यवसायिक पाणीवापरही कमी झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहिले. तसेच मान्सून वेळेत दाखल झाल्याने पाणलोट क्षेत्रातून धरणांमध्ये पुन्हा पाण्याची आवक वेगाने सुरू झाली. परिणामी नद्या-नाल्यांना ही पाणी आले. विहिरीही रिचार्ज झाल्या. बोअरवेलला पाणी वाढले. याची परिणती जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरवर सकारात्मक बदलातून झाली.

एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला ५२ वर गेलेली टँकरची संख्या दोन आठवड्यापूर्वी कमी होत दोन वरून चालू आठवड्यात शून्य झाली. म्हणजेच जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्येही आता मुबलक पाणी असल्याने जिल्ह्यावरील टंचाईचे संकट दूर झाल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या आकड्यांवरून दिसून येते. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, बागलाण या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता

- Advertisment -

ताज्या बातम्या