Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआजपासून नाशिक-दिल्ली लाँग मार्च

आजपासून नाशिक-दिल्ली लाँग मार्च

नाशिक । Nashik

केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या वतीने आज (दि.21)पासून नाशिक शहरात नाशिक ते दिल्ली वाहनांचा लाँगमार्ग काढण्यात येऊन आहे.

- Advertisement -

या लाँगमार्चचे नेतृत्व अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी अध्यक्ष जे. पी. गावित, जनरल सेक्रेटरी डॉ. अजित नवले, सीटूचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, इरफान शेख, सुनिल मालुसरे आदी करणार आहे.

दुपारी 12 वाजेपर्यत राज्यभरातील शेतकरी नाशिकच्या गोल्फ क्लब येथे जमणार आहे. याठिकाणी जाहीर सभा होणार असून यानंतर जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन लाँगमार्च सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या