Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक क्रिकेट अकादमीची हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीवर मोहोर

नाशिक क्रिकेट अकादमीची हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीवर मोहोर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी च्या १६ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद नाशिक क्रिकेट अकादमीने पटकाविले…

- Advertisement -

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या २२ यार्ड्स क्रिकेट क्लब ला २०५ धावांत बाद करून, नाशिक क्रिकेट अकादमी चा कर्णधार शर्विन किसवे च्या नाबाद शतकाच्या जोरावर २०६ धावांचा यशस्वी पाठलाग करत २२ यार्ड्स वर ४ गडी राखून विजय मिळविला.

सामन्याचा धावपलक

२२ यार्ड्स क्रिकेट क्लब सर्वबाद २०५ – ओम कोकणे ५१, मोहम्मद साकीब ४२, अश्विन हौसारे नाबाद ३७. प्रतिक तिवारी व गौरव कुलकर्णी प्रत्येकी ३ तर निखिल खत्री, साहिल पारख, कार्तिकेश चौरे व अनिकेत गायकवाड प्रत्येकी १ बळी वि. नाशिक क्रिकेट अकादमी ६ बाद २०६ – शर्विन किसवे नाबाद १०७, आर्यन पालकर २६. कृष्णा बच्छाव २ तर देवांश पाटील . साई निकम व शौनक साठे प्रत्येकी १ बळी. नाशिक क्रिकेट अकादमी ४ गडी राखून विजयी.

उपांत्य फेरीचे सामने

द्वारका क्रिकेट अकादमी सर्वबाद १३३ – रोहित पूरोहित २८, गुरमान रेणु २७, शौनक साठे, कृष्णा बच्छाव व अश्विन हौसारे प्रत्येकी २ तर देवांश पाटील व तनय सोनवणे प्रत्येकी १ बळी. वि. २२ यार्ड्स क्रिकेट क्लब ८ बाद १३५- अक्षद धनवंत ४२, अश्विन हौसारे नाबाद २८ , रमन गुप्ता २०. गुरमान रेणु ३, समकीत सुराणा व संचित भागवत प्रत्येकी २ तर ऋषि द्विवेदी १ बळी . २२ यार्ड्स क्रिकेट क्लब २ गडी राखून विजयी.

नाशिक क्रिकेट अकादमी ७ बाद ३८८ – शर्विन किसवे १६४ ,आर्यन पालकर १४५.कृष्णा धोणार ३ तर आयुष ठक्कर व हर्षं वाघ प्रत्येकी १ बळी. वि. एन डी सी ए मॉर्निंग – सर्वबाद १७१ – इशान दवे ४२, प्रसाद दिंडे ३८,आयुष ठक्कर २१. नाशिक क्रिकेट अकादमी २१७ धावांनी विजयी.

- Advertisment -

ताज्या बातम्या