Monday, April 29, 2024
HomeUncategorizedअसे आहे क्रेडाईचे कोविड सेंटर !

असे आहे क्रेडाईचे कोविड सेंटर !

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे चाळीस हजार चौ. फुटाचे कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आव्हान केलेला होते. त्याला प्रतिसाद देत क्रेडाई नाशिक मेट्रोने सामाजिक बांधिलकीचे भान राखत 350 बेडचे सेंटर उभारले आहे.

- Advertisement -

या ठिकाणी 50 भेटला ऑक्सिजन जोडलेले आहेत तर महिलांसाठी स्वतंत्र 80 बेडचे दालन उभारण्यात आले आहे. संपूर्ण सेंटरमध्ये स्त्री व पुरुष असे दोन स्वतंत्र 20-20 शौचालय व 20- 20 स्नानगृह उघडण्यात आले आहे.

कोविड बाधितांना आजारपणाचा भास राहू नये म्हणून मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच कॅरम, बुद्धिबळ, लुडो, योगाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संगीताचा आनंद घेण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट, विविध रंगांच्या चित्र व सकारात्मक संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले आहे. क्रेडाई नाशिकने उभारलेले सुसज्ज आणि आकर्षक केंद्राची चर्चा राज्यात होत असून क्रेडाईच्या राज्यातील विविध शाखांच्या माध्यमातून कोविड सेंटरच्या उभारणीबाबत चौकशी केली जात आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प उभा राहिला असून या प्रकल्पाच्या उभारणी चे आलेखन व नियोजन अनिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

या संपूर्ण कोळी सेंटरची उभारणी प्रवीण कमळे यांनी केली आहे ठक्कर डोम चे संचालक जितूभाई ठक्कर यांच्या पुढाकारामुळे हे सेंटर उभे राहू शकले आहे. पालकमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न क्रेडाई नाशिक मेट्रोने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या