केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी नाशिक सेंटरला अखेर मंजूरी

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी ( UPSC Examination) नाशिक येथे परिक्षा सेंटर ( Examination Center- Nashik )व्हावे यासाठी खासदार गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे . खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांच्या सततच्या पाठपुराव्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली असून युपीएससीच्या परिक्षेसाठी नाशिक सेंटरला मान्यता दिली आहे .

केंद्रीय लोकसेवा आयोगाने देशभरात चार नवीन परिक्षा केंद्रांना मान्यता दिली असून त्यात महाराष्ट्रातील नाशिक या एकमेव केंद्राचा समावेश आहे . दरवर्षी उत्तर महाराष्ट्रातील सुमारे पंधरा हजार विद्यार्थी युपीएससीची परिक्षा देत असतात . आयोगाच्या निर्णयामुळे परिक्षार्थीना मोठा दिलासा मिळणार असून पुढील वर्षापासून आयोगातर्फे घेण्यात येणा – या एनडीए , सीडीएसची परिक्षाही नाशिक केंद्रावरूनच होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे .

यापूर्वी राज्यातील मुंबई , नवी मुंबई , पुणे , ठाणे , नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परिक्षा केंद्र होते . उत्तर महाराष्ट्रात कोठेही परिक्षा केंद्र नसल्याने नाशिक , धुळे , जळगाव , नगर आणि नंदूरबार या पाच जिल्हयांमधील हजारो विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मुंबई , नवी मुंबई , पुणे , ठाणे , नागपूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये जावे लागत असे .

यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत होती . तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा वेळ आणि पैसाही वाया जात असे . नाशिक येथे परिक्षा केंद्र नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असे . यातुनच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परिक्षा केंद्र व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते .

जुलै २०१७ मध्ये खासदार गोडसे यांनी आयोगाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांना विशेष पत्र लिहून नाशिक येथे परिक्षा सेंटर व्हावे यासाठी आग्रही मागणी केली होती . त्यानंतर खासदार गोडसे यांनी दिल्लीत जावून आयोगाचे चेअरमन डेव्हिड यांची प्रत्यक्ष भेट घेवून नाशिक येथे आयोगाचे परिक्षा सेंटरचे महत्व पटवून दिले होते . त्यानंतर गोडसे यांनी वेळोवेळी आयोगाचे चेअरमन डेव्हिड आणि सचिव राजेश कुमार सिन्हा यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरूच होता . खा.गोडसे यांची विद्याथ्यांविषयीची तळमळ डेव्हिड यांना चांगलीच भावली होती .

सध्या कोणत्याही शहरात आयोगाचे नवीन परिक्षा केंद्र सुरू करण्याचा विचार नसून नवीन केंद्र सुरू करतांना सर्वप्रथम नाशिकचा विचार केला जाईल असे लेखी पत्र दोन वर्षांपूर्वी चेअरमन डेव्हिड यांनी खासदार गोडसे यांना दिली होती अखेर आज खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे .

आयोगाने एका परिपत्रकाद्वारे देशभरातील चार नवीन परिक्षा केंद्रांना मंजूरी दिली असून त्यामध्ये अलमोरा ( उत्तराखंड ) , श्रीनगर ( उत्तराखंड ) , नाशिक ( महाराष्ट्र ) , सुरत ( गुजरात ) या परिक्षा केंद्रांचा समावेश आहे . आयोगाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबर मध्ये होणा – या परिक्षा नाशिक येथील केंद्रावरच होणार आहे . त्यासाठी लवकरच ऑनलाइन साईट ओपन होणार असून स्कीनवर नाशिक सेंटर हा पर्याय दिसणार आहे .

आयोगाने नाशिक परिक्षा सेंटरला मान्यता दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील विद्याथ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . यावर्षी होणा – या आयोगाच्या सीएसपी परिक्षेसाठी मुंबई येथून १४,८१ ९ , नागपूर येथून २२,८४२ , औरंगाबाद येथून १५,३५५ , नवी मुंबई येथून ११,८५५ पुणे येथून ३०,३०० तर ठाणे येथून १०,३५० विद्यार्थी परिक्षा देणार असून यापुढे या विद्यार्थ्यासाठी नाशिक सेंटर हा देखील पर्याय असणार आहे .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *