Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसलग दुसऱ्या आठवड्यात शनिवारी 'नाशिक बंद'; उल्लंघन करणाऱ्या आस्थापना होणार 'सील'

सलग दुसऱ्या आठवड्यात शनिवारी ‘नाशिक बंद’; उल्लंघन करणाऱ्या आस्थापना होणार ‘सील’

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात सलग दुसऱ्या आठवड्यात बंद शनिवारी बंद पाळण्यात येत आहे. नाशिकमधील रविवार कारंजा, पंचवटी, सीबीएस परिसर, मुख्य बाजारपेठ मेनरोड परिसर पूर्णपणे बंद अवस्थेत आढळून आला. अत्यावश्यक सेवा वगळता या भागात कुठल्याही अस्थापना सुरु नव्हत्या.

- Advertisement -

पंचवटी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात खूप गर्दी असल्याच्या तक्रारी आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. याबाबत सभापती देविदास पिंगळे यांच्याशी जिल्हाधिकारी मांढरे यांनी चर्चा करत येथील गर्दी तत्काळ कमी करण्याबाबत सूचना केल्या. तसेच गर्दी कमी न झाल्यास बाजार समिती बंद करावी लागेल अशीही तंबी त्यांनी दिली आहे.

अधून मधून उघडल्या जाणाऱ्या दुकानांवर दंडाची कारवाई मनपाची पथके करीत असल्याचे ते म्हणाले. फुड जॉइंट्स, मिठाई दुकाने या ठिकाणी केवळ आणि केवळ टेक-अवे ला परवानगी असून त्या ठिकाणी उभे राहून खाणे यास सक्त मनाई असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

या बाबीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकावर निश्चित करण्यात आली आहे. अशा ठिकाणी गर्दी दिसून आल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यापुढे आता दंडा सोबत अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना शासनाचे अधिसूचने प्रमाणे कोरोना जाईपर्यंत सील केल्या जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.

नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कोरणा रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे दोन दिवस लॉकडाऊन घोषित केला आहे.

आज या लॉक डाऊनला सुरुवात झाली नाशिकरोडकरानी उस्फूर्त प्रतिसाद दिला परिसरातील सुभाष रोड, जेल रोड, मुक्तिधाम चौक परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सिन्नर फाटा, आर्टिलरी सेंटर रोड, जय भवानी रोड, दत्त मंदिर रोड, देवळाली गाव, अनुराधाचा परिसर, सराफ बाजार आदी भागात संपूर्णपणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू होती मेडिकल भाजीपाला बाजार हॉटेल फळबाजार आदी ठिकाणी नागरिक काही प्रमाणात दिसत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या