नाशिक बाजार समितीत लिलाव पुर्ववत; हे नियम बंधनकारक, अशी असेल लिलावाची वेळ

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक/पंचवटी | प्रतिनिधी

नाशिक बाजार समितीमध्ये करोना नियमांचे पालन करुन पालेभाज्या, फळभाज्या यांचे व्यवहार सुरळीतपणे सुरु करणार असल्याची माहिती माजी खा. देविदास पिंगळे दिली…

नाशिक जिल्हयामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी राज्य शासनाचे आदेशानुसार, जिल्हयामध्ये दि. १२ ते २२ मेपर्यत लॉकडॉऊनची घोषना केली आहे.

यादरम्यान बाजारसमित्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु नाशिक जिल्हयात व नाशिक बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणावर पालेभाज्या, फळभाज्या तसेच फळे यांची आवक होत असल्याने शेतक-यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान होत आहे.

त्यामुळे शेतक-याच्या शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती माजी खा. पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्यासोबत चर्चा केली.

यानंतर शरदचंद्र पवार मार्केट यार्ड पेठरोड, पंचवटी येथील मुख्य मार्केटयार्ड, तसेच नाशिकरोड येथील उपबाजार आवार येथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्याने शेतक-यांचा नाशवंत शेतीमाल करोना नियमांचे पालन करून विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले.

हे नियम बंधनकारक

१ आडत्यांनी काम करतांना २५ टक्के हमालांच्या उपस्थितीत कामकाज करावे.

२. महिला हमाल वर्गास प्रवेश दिला जाणार नाही.

३. सोशल डिस्टन्सींग ठेवनु शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

४. शेतीमाल लिलावाचे ठिकाणी लावतांना मालामध्ये १० फुटांचे अंतर ठेवावे.

५. शेतकरी बांधवांना शेतीमालाची वाहतुक करतांना वाहनासोबत एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार आहे.

६. शेतक-यांनी त्यांचे वाहनातून शेतीमाल लिलावाचे ठिकाणी उतरविलेनंतर सदरचे वाहन बाजार समितीने सुचविलेल्या जागेमध्येच पार्क करणे बंधनकारक आहे.

७. शेतक-यांने त्यांचा शेतीमाल ठरवून दिलेल्या वेळेच्या तास अगोदर बाजार समितीचे आवारात विक्रीकामी आणावयाचा आहे.

८. अनाधिकृत व्यक्तीने बाजार समितीचे आवारात प्रवेश केल्यास त्याच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

९. बाजार समितीच्या अधिकृत व्यापा-यांनी शेतीमाल खरेदी केल्यानंतर त्यांनी शेतीमाल २ तासांचे आत पॅकींग करून बाजार समितीचे आवाराचे बाहेर घेउन जाणे बंधनकारक आहे.

१०. व्यापा-यांना त्यांना आवश्यकतेप्रमाणे हमालांना ओळखपत्र बघुन प्रवेश दिला जाईल.

११. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये पंचवटी मार्केटयार्ड मध्ये सकाळच्या वेळेस भरण्यात येणारे किरकोळ भाजीपाला व वजनकाटा लावन विक्री करणारे, चोली-दलाल यांचे व्यवहार पुर्णपणे बंद करण्यात आला आहे.

१२. रात्रीच्या वेलीचे शेतमालाचे व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले आहेत.

१३. शरदचंद पवार मार्केटयार्डमधील कांदा-बटाटा, फळे, अन्नधान्य या शेतीमालाचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

शेतकरी बांधवानी बाजार समितीने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त आणलेल्या वेळेत शेतीमालास बाजार समितीत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची किरकोळ विक्री करता येणार नाही. आणलेल्या शेतीमालाची केवळ जाहीर लिलावानेच विक्री केली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *