Saturday, April 27, 2024
Homeनगरसहकारमहर्षी कोल्हे देशातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना - नरेंद्र अग्रवाल

सहकारमहर्षी कोल्हे देशातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना – नरेंद्र अग्रवाल

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आजवर आपण भेटी दिलेल्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा सर्वात अग्रगण्य कारखाना असल्याचे मत नॅशनल शुगर इन्स्टीट्यूट कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

शनिवारी संजीवनी उद्योग समुहास श्री. अग्रवाल यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे यांनी प्रास्ताविक करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने 1960 सालापासून केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला व सहकारात प्रथमच देशपातळीवर पॅरासिटामॉल या औषधी प्रकल्पाची कारखान्याने उभारणी सुरू केल्याचे सांगितले.

कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच प्रा. नरेंद्र मोहन अग्रवाल यांचे अधिपत्याखाली एन. एस. आय ने मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय गौरवाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, चीफ केमिस्ट विवेक शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, डिस्टीलरी मॅनेजर राधाकृष्ण जंगले, डेप्युटी चीफ केमिस्ट अनिल राडे, एच आर मॅनेजर प्रदीप गुरव यांच्यासह विविध खातेप्रमुख, उप खातेप्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या