Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनरेडको होमेथॉनचा आज समारोप

नरेडको होमेथॉनचा आज समारोप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नरेडको होमेथॉन 2022 प्रॉपर्टी एक्स्पो (Naredco Homeathon – 2022 Property Expo)प्रदर्शनाचा आज समारोप होणार आहे. याप्रसंगी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 40 हजार नागरिकांनी आतापर्यंत भेट दिली असून 3 दिवसांत सुमारे 227 ग्राहकांचे घर आणि व्यावसायिक शॉपचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , सहसमन्वयक शंतनु देशपांडे, प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, होमेथॉनचे सहप्रायोजक व सिटी लिफ्टचे संचालक नवीन राजगोपालन, ऐनव्हीरोचे संचालक सौरभ देसाई, के नेस्टच्या प्रियंका यादव, युनियन बँक ऑफ इंडिया डेप्युटी जनरल मॅनेजर सुमेर सिंग आदी मान्यवर समारोप प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, तसेच समारोपाच्या समारंभास प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. होमेथॉन प्रदर्शन यशस्वीतेसाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, भाविक ठक्कर, मयूर कपाटे, अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे, आदी प्रयत्नशील आहेत. गिफ्ट पार्टनर म्हणून तेजस्वी ज्वेलर्स परेश शहा यांचे विशेष सहकार्य लाभले.

गेल्या चार दिवसांत या प्रदर्शनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी भेट दिली. तसेच नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनाच्या ब्रँड अँबेसिडर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्वांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी कंठानंद महाराज यांनीही भेट देऊन प्रदर्शनाच्या पदाधिकारी आणि संयोजकांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे माजी खासदार देवीदास पिंगळे, आ. देवयानी फरांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, शिवाजी गांगुर्डे आदीसह नाशिक शहरासह जिल्ह्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आदि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली.

प्रथमच या प्रदर्शनास स्टॉल लावला असून या प्रदर्शनात ग्राहकांचा अत्यंत चांगला अनुभव येत आहे. नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, देवळालीगाव भागातील नागरिक देखील या प्रदर्शनाला भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारचे प्रकल्प फ्लॅट अत्यंत बजेटमध्ये उपलब्ध असून प्रत्येकासाठी येथे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली.

-हेमंत गायकवाड, प्रभावी कन्स्ट्रक्शन

होमेथॉन प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत चांगला असून यातून अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळाली. येथील डिस्प्ले आणि मांडणीची सर्व व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. प्रेझेंटेशन देखील चांगले आहे.

– उमेश कुंभोजकर, नाशिक

होमेथॉन प्रदर्शन बघून आम्हाला आनंद वाटला. या ठिकाणी गृहप्रकल्पांची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आम्हाला मिळाली. तसेच आमचा देखील नाशिकमध्ये घर घेण्याचा विचार असून या संदर्भात शोध सुरू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली.

-सोमनाथ शिंदे, सायखेडा

होमेथॉन प्रदर्शन बघण्यासाठी मी खास नाशिक शहरात आलो. नाशिक शहर अत्यंत सुंदर आहे. येथील गृहप्रकल्प देखील छान आहेत. शहरातील वातावरण अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मला येथे घर घेण्याची इच्छा निर्माण झाली.

-सतीश धाकड, शिरपूर

प्रदर्शनाच्या माध्यमातून मला दरवाजे (डोअर ) निर्माण करणार्‍या आमच्या कंपनीची प्रचार करता आला. होमेथॉन प्रदर्शनामुळेच बांधकामांसंबंधीच्या अन्य उद्योग व्यवसायाला देखील मोठी चालना मिळत आहे.

– विद्याधर कुरकुरे, नाशिकरोड

- Advertisment -

ताज्या बातम्या