Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकनशेच्या गोळ्या-औषधे जप्त

नशेच्या गोळ्या-औषधे जप्त

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

नशा करण्यासाठी वापरण्यात येत असलेली औषधे व कुत्ता गोळीं ( Kutta Goli ) मालेगावी विक्रीसाठी सुरत येथून आणणार्‍या एकास विशेष पोलीस पथकाने जुना आग्रारोडवर सापळा लावून जेरबंद केले. मुक्तार अहमद मोहंमद अरमान याच्याकडून अल्प्राकॅन गोळ्या व कोनॅक्स औषधांच्या बाटल्या असा सुमारे 87 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.नशेसाठी गोळ्या व औषधे गुजरात राज्यातून आणली जात असल्याचे या कारवाईवरून उघडकीस आले आहे.

- Advertisement -

शहरात नशा येणारी औषधे (Narcotic drugs) व कुत्तागोळ्यांचे सेवन करीत तरूणांतर्फे गुन्हेगारी कृत्य केली जात असल्याचे अनेक गुन्ह्यांवरून उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर नशेच्या औषधांची व कुत्तागोळींची विक्री करणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पथकास दिले आहे.

या पथकाचे उपनिरीक्षक विजय गोपाळ यांना नशेसाठी लागणारी अल्प्राकॅन गोळ्या व कोनॅक्स औषधांच्या बाटल्यांचा साठा विक्रीसाठी गुजरात येथील सुरतमधून मालेगावी आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून जुना आग्रारोड भागात विशेष पथकाचे उपनिरीक्षक गोपाळ, हवा. पंकज भोये, वसंत महाले, भुषण खैरनार, संदीप राठोड यांनी सापळा लावला होता.

प्रवासी दोन बॅगा घेवून मुक्तार अहमद हा पाळत ठेवून असलेल्या पोलीस पथकास दिसताच त्यास ताब्यात घेवून पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात अल्प्राकॅन गोळ्यांची 1 हजार 400 पाकिटे व कॉनेक्स औषधांच्या बाटल्या असा साठा दिसून आल्याने पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अन्न औषध निरीक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांच्या फिर्यादीवरून मुक्तार विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या