Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरनान्नजदुमालाः सरपंचपदी कडनर बिनविरोध

नान्नजदुमालाः सरपंचपदी कडनर बिनविरोध

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या नान्नजदुमाला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाऊसाहेब पाटीलबा कडनर यांची बिनविरोध निवड (Unopposed selection) करण्यात आली. सरपंचपदाच्या बिनविरोध निवडीनंतर (Sarpanch Unopposed selection) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात समर्थक (Supporter of Revenue Minister Balasaheb Thorat) काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress Workers) गुलालाची उधळण करीत जोरदार जल्लोष साजरा केला.

- Advertisement -

नान्नजदुमाला ग्रामपंचायतचे (Nannajdumala Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंच भिमराज नामदेव चत्तर यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही, या कारणास्तव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चत्तर यांचे सरपंचपद रद्द केले होते. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचपद रिक्त होते. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) व साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी सरपंच बाबासाहेब कडनर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब पाटीलबा कडनर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने भाऊसाहेब कडनर यांची निवड बिनविरोध पार पडली. प्रसंगी उपसरपंच रंजना रोकडे, विठ्ठल गायकवाड, नारायण फड, मच्छिंद्र चत्तर, झुंबर दळवी, शांताबाई उगलमुगले, चंद्रकला कोळपे उपस्थित होते. सरपंचपदाच्या बिनविरोध निवडीसाठी माजी सरपंच बाबासाहेब कडनर, नानासाहेब चत्तर, संतोष कडनर, कैलास मोकळ सहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. के. जेडगुले यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी एस. बी भालेराव यांनी त्यांना सहाय्य केले.

यशोधन कार्यालयात नवोदित सरपंच भाऊसाहेब कडनर यांचा थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती शंकर पाटील खेमनर, इंजि. बी. आर. चकोर, माजी सरपंच बाबासाहेब कडनर उपस्थित होते. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेवून ग्रामविकासाठी आपण काम करू, अशी ग्वाही नवोदित सरपंच भाऊसाहेब कडनर यांनी दिली.

पुन्हा थोरात गटाचा झेंडा !

नान्नजदुमाला ग्रामपंचायतीत महसूलमंत्री थोरात गटाकडे बहुमत होते. मात्र भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भीमराज चत्तर लोकनियुक्त सरपंचपदी होते. मात्र मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही, या कारणास्तव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले त्यांचे पद रद्द ठरविले. त्यामुळे सरपंचपदी भाऊसाहेब कडनर यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा थोरात गटाचा झेंडा फडकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या