Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनांदुरी आरोग्य उपकेंद्राकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

नांदुरी आरोग्य उपकेंद्राकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

सप्तशृंगीगड | Saptsrungigad

नांदुरी येथील आरोग्य केंद्रातील समस्यांविषयी आरोग्य विभागाला वारंवार तोंडी सुचना करूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहे.

- Advertisement -

सप्तशृंगीगड येथे मागील काही महिन्यांपासून करोना संक्रमण असतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नव्हती. जेव्हा दिल्लीहुन केंद्र शासनाचे करोना परीक्षण पथक येत असल्याची माहिती मिळाल्याने डॉ.एन.पी.के सिद्धू यांनी भेट दिली.

याबाबत वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आरोग्य केंद्रावर असलेले वैद्यकीय अधिकारी विना मास्क कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक करत असल्याचे दिसून आले.

तसेच आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसून नाशिकहून ये जा करीत असल्याची तक्रारही यावेळी ग्रामस्थांनी केली. याबाबत जिल्हा वरिष्ठ अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

त्यामुळे नांदुरी आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या १९ गावांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या