Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअल्पवयीन मुलीचा खून; मृतदेह शेतात फेकला

अल्पवयीन मुलीचा खून; मृतदेह शेतात फेकला

सारंगखेडा – Sarangkheda – वार्ताहर :

प्रेमसंबंधाला नकार दिल्याने संबंधीत अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने गळा कापून मृतदेह शेतात फेकून दिल्याची घटना

- Advertisement -

सारंगखेडा (ता.शहादा) येथे मध्यरात्री घडली. खून करणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना काही तासातच यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सारंगखेडा येथील भूत बंगला परिसरात मयत सुजाता संतोष सोनवणे व आरोपी किशोर वडार यांच्यात प्रेम संबंध असल्याचा संशय मयताच्या वडिलांना होता.

त्यांनी आरोपीस माझ्या मुलीशी संबंध ठेवू नको तसेच माझ्या मुलीशी बोलू नको अशी सूचना दिल्यावरदेखील आरोपी किशोर हा तिच्या संपर्कात होता.

वडिलांच्या समजावण्यावरून मुलीने आरोपीस संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन आरोपीने दि.23 तारखेच्या रात्री 12.30 ते सकाळी 6 च्या दरम्यान आरोपीने धारदार शस्राने तिचा गळा कापून खून करून मृतदेह शेजारील शरद बाबुलाल पाटील यांच्या शेतात फेकून दिला.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक डांगरे, फॉरेन्सिक टीमचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी स्थानिक पोलीस स्त्रोत वापरुन गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या मदतीने आरोपी किशोर वडार यास अटक करण्यात आली आहे. संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून किशोर वडार याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास नजन पाटील करीत आहे. आरोपीला उद्या (ता.24) रोजी शहादा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या