Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारशेतातील बांबु कापल्याच्या कारणावरुन एकाची हत्या

शेतातील बांबु कापल्याच्या कारणावरुन एकाची हत्या

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

शेतातील बांबु कापल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने

- Advertisement -

डोक्यावर, कपाळावर बांबुने मारहाण करुन एकाचा खून केल्याची घटना खडकीचा आमदीरपाडा (ता.धडगाव) येथे घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक (खडकी, ता.धडगाव) याने मेरवान हुणार्‍या रावताळे व जलसिंग होणार्‍या रावताळे (वय 35, रा.खडकीचा आमदीरपाडा) यांच्या शेतालगत असलेल्या बांबुची झाडे कापली होती.

या कारणावरुन त्यांच्यात होळीचा सण झाल्यानंतर वाद झाला होता. परंतू सदर वाद मोठा नसल्याने मेरवान रावताळे व जलसिंग रावताळे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली नव्हती. याच वादाच्या कारणावरुन दि.29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास खडकीचा गुराडपाडा शिवारात राजल्या दुरसिंग पावरा यांच्या शेतात प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक याने वाद निर्माण करुन बांबुच्या पावाने जलसिंग रावताळे याच्या डोक्यावर, पोटावर, कपाळावर, छातीवर मारहाण करुन जीवे ठार केले.

याबाबत मेरवान हुणार्‍या रावताळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रकाश नाईक याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या