Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार नगरपालिकेतर्फे व्यापारी संकुल बांधकामाला मंजुरी

नंदुरबार नगरपालिकेतर्फे व्यापारी संकुल बांधकामाला मंजुरी

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नगरपालिका अंतर्गत शहरातील टिळक रस्त्यावरील प्राथमिक शाळा क्रमांक 10 आणि सिंधी कॉलनीतील प्राथमिक शाळा क्रमांक 13 या जागेवर बांधा वापरा व हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधणे या कामाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान ऑफलाइन सभेचे ऐवजी ऑनलाईन सभा झाल्यामुळे चर्चेला वाव मिळाला नाही.यासह विविध मागण्यांसाठी भाजपाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला.

- Advertisement -

नंदुरबार येथे पालिकेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी होत्या. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले तसेच एकूण 14 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, संजय माळी, दीपक पाटील, मोतीलाल मराठी उपस्थित होते. रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झराळी येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रासाठी सन 2021 -22 या वित्तीय वर्षासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी, गॅस, टँकर खरेदी करणे, शहराच्या मंजूर विकास योजनेतील नगरपरिषद मालकीचे सिटी सर्वे नंबर 10 99 चे क्षेत्र 351 पॉईंट दोन चौरस सेंटीमीटर या प्राथमिक शाळा असलेल्या विद्यमान वापर वरून वाणिज्य प्रयोजनासाठी करणे बाबत विचार विनिमय करण्यात आला. सन 2021- 2022 या वित्तीय वर्षासाठी पाणीपुरवठा उपयोग पाईपलाईन दुरुस्ती करणे व पाणीपुरवठा विभागाकडील इतर कामे करणे कामी मटेरियल, मजुरी सर्व कामे करण्यासाठी अभिकर्ता नियुक्त करणे व त्या कामी येणार्‍या आदमासे खर्चास मान्यता देण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर 643 / 1 चे क्षेत्र शेती विभागातून रहिवास विभागात समाविष्ट करणे बाबत आलेल्या विनंती अर्जावर चर्चा करण्यात आली.

नगर परिषदेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षात जमा आणि खर्चाचा हिशोब मंजूर करण्यात आला. सन 2021- 2022 या वर्षाकरिता पाणीपुरवठा विभागाकडील इलेक्ट्रीक मोटारी, सबमर्सिबल पंप, रिवाइंडिंग करणे, दुरुस्ती करणे ,कामी वार्षिक दर मागणी व अदमासे खर्चास मंजुरी देण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर 84 क्षेत्र शेती विभागातून रहिवास विभागात समावेश करणेबाबत आलेल्या विनंती अर्ज विचार करण्यात आला. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 10 आणि 13 या ठिकाणी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारणे बाबत मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण मापदंडानुसार शहरात विविध ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालय तीन वर्षासाठी देखभाल-दुरुस्ती करिता देण्यासाठी दर मागवणे बाबत चर्चा करण्यात आली. शहरातील पाताळगंगा नदीलगत नगरपालिकेच्या मालकीच्या धोबी घाट व कंपाउंड वॉल भाडेकराराने मिळणेबाबत आलेल्या विनंती अर्जावर चर्चा करण्यात आली.

वित्तीय वर्षाकरिता नागरी आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी व निधी मागणीकरिता शासनास सादर करणे बाबत चर्चा करण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर 405 चे क्षेत्र सार्वजनिक सार्वजनिक विभागातून वरून रहिवास विभागात समाविष्ट करणे बाबत आलेल्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. दि. 27 मार्च 2000 पूर्व नगर परिषद सेवेत विशेष बाब म्हणून संभाषण झाले व मान्यता मिळालेले मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणे बाबत सादर केलेल्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. तसेच मोटार वाहन विभागातील चालक एलिस दादाभाऊ यांचे कायमस्वरूपी बंद केलेली एक वेतनवाढ सुरू करणे बाबत दिलेल्या विनंती अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. अवघ्या दहा मिनिटात चौदा विषयांना मंजुरी देण्यात आली. शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन सभा असल्यामुळे मोजके नगरसेवक यात सहभागी झाले होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्षातर्फे रविवारच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्यात आला होता.

निवृत्तीनंतर वारसाच्या नोकरीचा महिनाभरात ठराव महिनाभरापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागी वारसाहक्काने नोकरी देण्याचा ठराव आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला. पालिकेच्या इतिहासातील हा कर्मचार्‍यांनाही देणारा पहिला ठराव ठरला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांनी दिली.

भाजपा नगरसेवकांनी मागणी करूनही रविवारीया नगरपालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाल्याने आम्ही त्याचा निषेध करत बहिष्कार टाकल. ऑफलाइन सभेचे ऐवजी ऑनलाईन सभा झाली असती तर चर्चेला वाव मिळाला असता. तसेच व्यापारी संकुलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधारीचा प्रयत्न आहे.भाजपा नगरसेवकांनी व्यापारी संकुला ऐवजी पार्कीग तयार करण्याची मागणी केली होती.मात्र आज ऑनलाईन सभेच्या माध्यमातुन व्यापारी करण करण्यासाठीच सभेचे आयोजन करण्यात आले होते.

– चारूदत्त कळवणकर, विरोधी पक्षनेता, नंदुरबार

- Advertisment -

ताज्या बातम्या