Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनोकरीचे अमिष देवुन साडेसात लाखांत फसवणूक

नोकरीचे अमिष देवुन साडेसात लाखांत फसवणूक

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

लिपिक म्हणून माध्यमिक संस्थेत नोकरी लावून देण्याचे अमिष देत एकाची तब्बल साडेसात लाख रुपये घेत

- Advertisement -

फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील प्रमोद गोविंद मराठे यांना तळोदा येथील संदीप अभिमन्यू वळवी यांनी एका माध्यमिक संस्थेत लिपिकाची नोकरी लावून देण्याचे अमिष दिले.

त्यासाठी प्रमोद मराठे यांच्याकडून संदीप वळवी यांनी साडेसात लाख रुपये इतकी रक्कम घेतली. मात्र लिपिकाची नोकरी लावून न देता सदरची रक्कमही परत केली नाही.

बर्‍याचदा पैशांची मागणी करूनही परत न केल्याने प्रमोद मराठे यांच्या फिर्यादीवरून संशयित संदीप वळवी याच्याविरोधात भादंवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केदार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या