Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारमुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातार्‍याला बदली

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातार्‍याला बदली

नंदुरबार । प्रतिनिधी- NANDURBAR

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

- Advertisement -

त्यांच्याजागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यांनी आज दुपारीच आपल्या पदाचा कार्यभार सोडला असून ते सातार्‍याकडे रवाना झाले आहेत.

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार विनय गौडा यांनी दि. 11 फेब्रुवारी 2019 रोजी सांभाळला होता. तत्पुर्वी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

आज त्यांची सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

श्री.गौडा यांना बदलीचे आदेश प्राप्त होताच ते दुपारीच सातार्‍याकडे रवाना झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या