Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमहिला सुरक्षेच्या प्रश्नांबाबत भाजपा महिला आघाडीतर्फे मोर्चा

महिला सुरक्षेच्या प्रश्नांबाबत भाजपा महिला आघाडीतर्फे मोर्चा

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत

राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही. कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते.तरीही असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सोमवारी महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.

- Advertisement -

– खा.डॉ. हीना गावीत

असा आरोप करीत महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी काल सोमवारी राष्ट्रीय प्रवक्त्या खा.डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

सोमवारी सकाळी 10.51 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी करीत अत्याचार घटनांच्या निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले.

त्यात म्हटले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे.

अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.

राज्यातील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. शासनाला निवेदन पाठविले. परंतु, घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधाविधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई सरकारने घेतली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोर्चात प्रदेश सदस्य सविता जयस्वाल,नगरसेविका संगीता सोनवणे,अ‍ॅड.उमा चौधरी,संगीता सोनगिरे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -

ताज्या बातम्या